Largest gold Buddha statue

जगात अनेक देशात प्रचंड मोठ्या आकाराच्या मूर्ती बनविल्या गेल्या आहेत. सर्वात मोठी मूर्ती चीनच्या सिचुआन भागात असून ती बनविण्यासाठी 90 वर्षे लागली होती. मात्र जगातील सर्वात मोठी सोन्याची मूर्ती थायलंड मध्ये असून ती बुद्धाची आहे. थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये वाट ट्रेमित नावाच्या मंदिरात 9.8 फुट उंचीची ही मूर्ती आहे. ही मूर्ती 5500 किलो वजनाची असून सोन्याची आहे(Largest gold Buddha statue).

    ही मूर्ती विकाऊ नाही पण आजच्या बाजारभावानुसार तिची किंमत 19 ते 20 अब्ज डॉलर्स आहे. विशेष म्हणजे ही मूर्ती अतिप्राचीन आहे मात्र जगापासून ती सोन्याची असल्याची बाब लपवून ठेवली गेली होती. 1954 मध्ये एका अपघातामुळे ही मूर्ती पूर्ण सोन्याची असल्याचे उघडकीस आले.

    झाले असे की या मूर्तीवर प्लास्टर लावून ठेवलेले होते. 1767 मध्ये त्याकाळाचा बर्मा आणि आताचा म्यानमार मधून थायलंडवर स्वाऱ्या केल्या जात होत्या. आक्रमकांपासून या मूर्तीचे रक्षण व्हावे आणि ती पळवून नेली जाऊ नये म्हणून आयुध्या विनाशपूर्वी त्यावर प्लास्टर लावण्याचे काम पूर्ण केले गेले होते. बँकॉकमधील नवीन मंदिरात ही मूर्ती हलविली जात असताना ती चुकून जमिनीवर पडली आणि प्लास्टर फुटले. तेव्हा मूर्ती पूर्ण सोन्याची असल्याचे उघडकीस आले.