
जर तुम्ही अशा व्यक्तीसोबत रिलेशनशिप आहेत जे आधीच मॅरीड आहे आणि तरीपण तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता तर तुमचं नातं पोकळ गोष्टींवर अवलंबून आहे. कारण अशा नात्यात अविश्वास आणि अप्रामाणिकपणा स्पष्ट दिसतो. त्यामुळे तुम्ही स्वत:लाचा फसवत आहात. जेव्हा तुम्ही एखादया मॅरीड व्यक्तीशी रिलेशन ठेवता तेव्हा फक्त तात्पूरत्या सुखाचा विचार करता. जे की खूप चुकीचं आहे आणि तुम्ही स्वत:लाच फसवत असता. ज्यामुळे तुम्हाला खरं प्रेम आणि खरा आनंद मिळत नाही.
- तुमचं ज्या मॅरीड व्यक्तीशी अफेअर आहे तो अनेकदा जबाबदारीपासून दूर पळतो. ते खऱ्या जगात वावरत नाही. ते कुटूंबापासून दूर पळतात. ते तुमची जबाबदारी तर पण कुटूंबाची जबाबदारी घेण्यासही मागे पुढे पाहतात.
- जेव्हा तुम्ही मॅरीड व्यक्तीशी प्रेमसंबंध ठेवता, तेव्हा नकळत तुमच्या आयुष्यावर आणि कामावरही प्रभाव दिसून येतो. जिथे ते त्यांच्या कुटूंबासोबत जातात तिथे तुम्हाला जाता येत नाही. कधी तुम्हाला तुमचा फोन नंबर बदलावा लागतो तर कधी तुमचा प्लॅन. तुम्ही नेहमी त्यांच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून राहता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल कामामध्ये अडचणी येऊ शकतात.
- तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी कुणाचं कुंटूंब उद्धस्त करण्याचा अधिकार आहे का? हे स्वत:ला विचारा. जेव्हा तुम्ही मॅरीड व्यक्तीसोबत राहणे, निवडतात. तेव्हा तुमचं इंटेशन एखाद्याचं कुटूंब तोडणे, नसतं. पण प्रत्यक्षात याचा त्रास त्या मॅरीड व्यक्तीच्या कुटूंबाला होतो.
- एखाद्या मॅरीड व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असणे, हे एक खूप मोठं ओझं असतं. याविषयी सतत अपराधीपणाची भावना येते. तुम्ही प्रेमासाठी योग्य नसल्याचेही सतत वाटते. मग शेवटी तुमच्यावरच अवलंबून असतं की कोणता निर्णय घ्यावा.