श्रीराम नेनेंना पाहून ‘धकधक गर्ल’चेही धडकले ‘दिल’, अशी घडली माधुरीची प्रेमकहाणी

कोट्यवधी लोकांवर मनावर राज्य करत माधुरीने आपल्या अभिनयाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. माधुरीने आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

  बॉलिवूडमधील सगळ्यात सुंदर आणि मराठमोळी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितची ओळख आहे. तिने तिच्या स्मित हास्याने आणि सुंदर अदाकारीने सगळ्यांच्या मनावर राज्य केले आहे. १५ मे ला माधुरी दीक्षितचा वाढदिवस असतो.वयाच्या १७ व्या वर्षी तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. कोट्यवधी लोकांवर मनावर राज्य करत माधुरीने आपल्या अभिनयाने अनेकांचे हृदय जिंकले आहे. माधुरीने आत्तापर्यंत अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचे मोठ्या संख्येने फॅन फॉलोवर आहेत. माधुरीने अबोध या चित्रपटातून सिनेमा क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तेजाब चित्रपटाने तिला खूप जास्त प्रसिद्धी मिळवून दिली. बॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये पहिल्या नंबरवर असलेल्या माधुरी दीक्षितने अमेरिकेतील सर्जन डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांची प्रेम कहाणी नेमकी कशी सुरु झाली?असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या दोघांची प्रेमकहाणी.

  पार्टीमध्ये झाली माधुरी-श्रीराम यांची ओळख

  माधुरी दीक्षितने टीव्हीवरील एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, श्रीराम नेने आणि माझी भेट ही अनपेक्षित आहे. आमच्या दोघांची पहिली भेट ही अमेरिकेतील भावाच्या पार्टीमध्ये झाली होती. तेव्हा श्रीराम नेने यांनी माधुरीला पहिल्यांदा पहिले होत. त्यावेळी श्रीराम नेने यांना माहित नव्हतं की माधुरी ही भारतामधील एक सुपरस्टार आहे.तसेच ती बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून हिंदी चित्रपटांमध्ये काम करते हे देखील माहित नव्हतं. त्यानंतर ते पहिल्यांदा भेटले होते तेव्हाच त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली. नंतर डॉ. नेने यांनी तिला विचारले होते की, तू माझ्याबरोबर डोंगरावर बाईक चालवण्यास येशील का? तेव्हा माधुरीला छान वाटले. पण तिथे जाणे अवघड असल्याचे तिने सांगितले.

  मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले

  नंतर माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. १७ ऑक्टोबर १९९९ त्यांनी अचानक लग्न केलं. माधुरीने अचानक लग्न केल्यानंतर तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले होते. लग्न केल्यानंतर माधुरी पुन्हा भारतामध्ये आली. भारतमध्ये येऊन तिने १० दिवसात सर्व चित्रपटांचे शूट पूर्ण करून ती सिनेमासृष्टीला निरोप देत अमेरिकेमध्ये स्थायिक झाली.

  अमेरिकेमध्ये १२ वर्ष पती आणि दोन मुलांसोबत राहिल्यानंतर तिने पुन्हा एकदा भारतामध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. भारतामध्ये आल्यानंतर तिने पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात पदार्पण केले. तिला पूर्वीसारखी प्रसिद्धी मिळाली नाही पण चाहत्यांच्या मनात अजूनही माधुरी दीक्षितचे नाव कायम आहे. माधुरी आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत. अमेरिकेच्या प्रसिद्ध डॉक्टरांपैकी एक असलेले डॉ. श्रीराम नेने हे सध्या मुंबईतील म. न. पा रुग्णालयात कार्यरत आहेत.