kite flying

मकर संक्रांतीच्या (Makar Sankranti 2022) दिवशी पतंग उडवण्याची (Kite Flying On Sankranti) परंपरा आहे. यादिवशी सकाळपासूनच आकाशात सर्वत्र रंगीबेरंगी पतंग दिसतात. बर्‍याच ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धादेखील आयोजित केल्या जातात. मकर संक्रांतीच्या उत्सवात पतंग का उडविला जातो (Reasons For Kite Flying On Makar Sankranti) यामागे काय कारणे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

  आपल्याकडे प्रत्येक सणाच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि त्या का कराव्यात यामागे खूप कारणे आहेत. मकरसंक्रांतीला  (Makar Sankranti 2022) पतंग उडवण्यामागे (Reasons For Kite Flying) एक आख्यायिका सांगितली जाते. तसेच पतंग उडवण्यामागे काही शास्त्रीय कारणेही आहेत.

  आख्यायिका
  मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. तमिळच्या तंदनान रामायणानुसार भगवान श्रीरामांनी मकरसंक्रांतीवर पतंग उडवण्याची परंपरा सुरू केली. असे म्हटले जाते की भगवान श्रीरामांनी उडवलेला पतंग थेट स्वर्गात पोहोचला. स्वर्गात पतंग इंद्राचा मुलगा जयंत याच्या पत्नीला सापडला. त्याला पतंग खूप आवडला आणि तो त्याने आपल्याकडे ठेवला. जयंतच्या पत्नीने विचार केला की, ज्याचा हा पतंग आहे तो पतंग घ्यायला नक्कीच येईल. तिकडे भगवान रामाने हनुमानाला पतंग आणण्यासाठी पाठविले. हनुमानांनी जयंतच्या पत्नीला पतंग परत करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी भगवान रामाला भेटण्याची इच्छा केली. ती म्हणाली की ती श्रीरामांच्या दर्शनानंतरच पतंग परत करेल.

  हनुमानांनी भगवान रामाला सगळा प्रकार सांगितला. भगवान राम म्हणाले की ती मला चित्रकूटमध्ये पाहू शकेल आणि हनुमानजीला पुन्हा हा आदेश देण्यासाठी पाठविले. जयंतच्या पत्नीला स्वर्गात जाऊन हनुमानजींनी भगवान रामाचा आदेश सांगितला. त्यानंतर त्यांनी पतंग परत केला.

  पतंग उडवण्यामागचे वैज्ञानिक कारण
  मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. पतंग उडवण्यामुळे हात व पायांचा व्यायाम होतो. मकर संक्रांतीचा सण थंडीमध्ये असल्याने हालचालींमुळे शरीराला उर्जा देखील मिळते. सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डी देखील मिळतो. याव्यतिरिक्त सर्दी खोकला यापासून बचाव होतो.

  पतंग उडवणे हा आनंदाचा क्षण आहे मात्र या आनंदाचे दु: खामध्ये रूपांतर होण्यास अजिबात वेळ लागत नाही. पतंग उडवण्यासाठी सुरक्षित जागा निवडा आणि चीनी मांजाचा वापर करू नका. तुमच्या पतंग उडवण्यामुळे कोणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.