makar sankranti

हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ मध्ये मकर संक्रांती (Makar Sankranti 2023) रविवारी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. सूर्य १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी  मकर राशीत प्रवेश करेल आणि १५ जानेवारी २०२३ रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल.

    मकर संक्रांतीला (Makar Sankranti 2023) हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. नवीन वर्षातला हा पहिला खास सण असतो. मकर संक्रांती कोणत्या तारखेला आहे याबाबत वेगवेगळी मते आहेत. तसेच दरवर्षी १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा करतात,मात्र यंदा १५ जानेवारी रोजी उदयोतिथीनुसार संक्रांत साजरी केली जाईल.

    मुहूर्त (Makar Sankranti Muhurt)
    हिंदू दिनदर्शिकेनुसार २०२३ मध्ये मकर संक्रांती रविवारी १५ जानेवारी रोजी साजरी केली जाईल. सूर्य १४ जानेवारी रोजी रात्री ८ वाजून २१ मिनिटांनी  मकर राशीत प्रवेश करेल आणि १५ जानेवारी २०२३ रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल. या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला विशेष महत्व आहे. याशिवाय या दिवशी स्नान, तीळ आणि गूळ इत्यादी दान करण्याची परंपरा आहे. यावेळी मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त सकाळी ७ वाजून १५ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटापर्यंत असेल. एकूण कालावधी ५ तास १४ मिनिटे आहे, तर महापुण्य काळ मुहूर्त ७ वाजून १५ मिनिटे ते ९ वाजून १५ मिनिटापर्यंत असेल. हा एकूण कालावधी २ तासांचा असणार आहे.

    मकर संक्रांतीची कथा (Makar Sankranti katha)
    या दिवशी सूर्याचे उत्तरायण होते म्हणजेच तो उत्तर गोलार्धात येतो. धार्मिक दृष्टिकोनातून असे मानले जाते की या दिवसापासून स्वर्गाचे दरवाजे उघडतात. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असेही सांगितले आहे की, जे उत्तरायण आणि शुक्ल पक्षाच्या काळात शरीराचा त्याग करतात त्यांना पुन्हा देह धारण करून मृत्यूलोकात यावे लागत नाही, म्हणजेच त्यांना मुक्ती मिळते. या संदर्भात एक आख्यायिका आहे. या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील असुरांचा पराभव करून त्यांच्यावर विजय मिळवला असे म्हटले जाते, तेव्हापासून भगवान विष्णूच्या या विजयावर मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. याशिवाय अनेक ठिकाणी पतंग उडवूनही हा सण साजरा केला जातो.

    दानाचा महिमा (Importance Of Giving)
    सूर्याच्या उत्तरायणाच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान आणि सूर्यदेव, नवग्रह आणि देवदेवतांची पूजा केल्यास इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक पुण्य मिळते, असे पुराण आणि धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितले आहे. असे मानले जाते की भगवान सूर्याने शनिदेवाला वरदान दिले आहे की वर्षातून एकदा तो मकर राशीत शनिदेवाच्या राशीत आल्यास तो शनिदेवाचे घर समृद्ध करेल. मकर राशीत आल्यावर शनिदेवाने सूर्यदेवाची तीळ आणि गुळाने पूजा केली. मकरसंक्रांतीच्या दिवशी शनिदेव आणि सूर्यदेवाच्या प्रसन्नतेच्या दिवशी लोकरीचे कपडे, कापूस, चादरी, वहाणा, धान्य, तीळ, गूळ आदी वस्तू गरजूंना दान कराव्यात.