अक्षय्य तृतीयेला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा अननसाचा शिरा

अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुग आणि सतयुग या युगांची सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्व दिले जाते. तसेच भगवान विष्णूची पूजा करून विष्णूला तांदूळ अर्पण केले जातात.

  अक्षय्य तृतीया सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हिंदू दिनदर्शिकेत हा एक महत्वाचा दिवस आहे. अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुग आणि सतयुग या युगांची सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्व दिले जाते. तसेच भगवान विष्णूची पूजा करून विष्णूला तांदूळ अर्पण केले जातात. यामुळे आयुष्यात अनेक लाभदायक फायदे होतात. अक्षय्य तृतीया सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व लाभले आहे. यादिवशी घरामध्ये नवीन वस्तू, गृहप्रवेश, पूजा,शांती यांसारखे अनेक कार्यक्रम केले जातात. या दिवशी अनेक घरांमध्ये वास्तुशांती किंवा पाहुण्यांना बोलावले जाते. मग घरी आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी नेमकं काय बनवायचं हा प्रश्न सगळ्याच पडतो. अशावेळी तुम्ही झटपट अननसाचा शिरा बनवू शकता. बाजारामध्ये अननस सहज उपलब्ध होतो. चला तर पाहुयात अननसाचा शिरा बनवण्याची रेसिपी.

  साहित्य:-

  एक वाटी अननसाचे प्युरी
  एक वाटी रवा
  अर्धा वाटी साखर
  वेलची पावडर
  काजू बदाम
  गरम पाणी
  केशर
  तूप

  कृती:-

  सर्वप्रथम अननसाचा शिरा बनवण्यासाठी १ वाटी रवा घेऊन तो साफ करून घ्या. त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर तूप गरम झाल्यावर त्यात रवा टाकून तो सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर त्यात अननसाची प्युरी टाकून हे मिश्रण नीट एकजीव करून घ्या. त्यानंतर मिश्रणात साखर टाकून ती नीट विरघळवून घ्या. ५ ते १० मिनिट रवा नीट शिजवून घ्या. साखर विरघळून झाल्यानंतर त्यात गरम पाणी टाकून शिरा चांगला शिजवून घ्या. शिरा शिजल्यानंतर त्यात चवीनुसार केशर, काजू बदामाचे तुकडे आणि चवीनुसार वेलची पावडर टाकून २ ते ३ मिनिट शिजवून घ्या. तयार आहे तुमचा अननसाचा शिरा.