गावरान पद्धतीने बनवा बाजरी खिचडा; रेसिपी जाणून घ्या

    साहित्य:

    •  एक वाटी बाजरी
    •  एक वाटी मूग डाळ
    •  अर्धी वाटी तांदूळ
    •  आवडीनुसार हिरव्या मिरच्या
    •  शेंगदाणे
    •  खोबऱ्याचे काप
    •  लसूण पाकळ्या
    •  कढीपत्ता
    •  जिरं
    •  मोहरी
    •  काळा मसाला
    •  मीठ चवीनुसार
    •  तेल
    •  सुक्या लाल मिरच्या
    • हळद
    • तिखट
    •  हिंग

     

    कृती 

    • सर्वप्रथम बाजरी स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे काढून 15 मिनिटं निथळत ठेवावी. 15 मिनिटांनंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बाजरी जाडसर वाटून घ्या.
    • बरेच लोक बाजरीचा कोंडा काढून टाकतात पण तसं करू नका. कारण हा कोंडाही पौष्टिक असतो.
    • मूगडाळ-तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. आता बाजरीची जाडसर भरड, मूगडाळ, तांदूळ एका स्टीलच्या पातेल्यात घाला. त्यात अंदाजे चार ते पाच वाट्या पाणी घालावे.
    • नंतर खोबरं, लसूण, जिरं आणि हिरवी मिरची मिक्सरमधून एकत्र वाटून घ्यावे. आणि हे वाटण त्यात घालावे. नंतर मग शेंगदाणे, काळा मसाला आणि चवीनुसार मीठ घालावे.
    • मोठ्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवून कुकरच्या दोन शिट्या करून 8 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर ठेवावे. प्रत्येक कुकरचा अंदाज वेगळा असतो. तेव्हा आपल्या अंदाजानुसार ठेवा.
    • साध्या खिचडीपेक्षा 5 ते 6 मिनिटं जास्त लागतील.खिचडा शिजल्यानंतर चमच्यानं नीट हलवून एकत्र करावा. कारण बाजरीचा लगदा भांड्याच्या तळाशी बसतो.
    • नंतर एका छोट्या कढलीत तेल तापवा. तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरं घालावे.ते तडतडलं की त्यात लसूण घालून चांगला लाल होऊ द्यावा.
    • आता त्यात कढीपत्ता घाला. कढीपत्ता तळला गेला की त्यात सुक्या लाल मिरच्या घाला.
    • नंतर हिंग, हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच गॅस बंद करावा. अशा प्रकारे बाजरीचा पौष्टिक खिचडा तयार आहे.