
साहित्य
- २ वाटी सोललेले मटार
- १ वाटी बारीक किसलेले पनीर
- १ ते १.५ चमचा आलं-लसूण-मिरची पेस्ट
- अर्धा चमचा धणे-जीरे पावडर
- आवडीनुसार चीझ
- चवीनुसार मीठ
- आवडीनुसार आमचूर पावडर किंवा चाट मसाला
- २ ते २.५ वाटी गव्हाचे पीठ किंवा मैदा
- पाव वाटी तेल
- अर्धी वाटी कोथिंबीर
कृती
गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून एका बाजूला ठेऊन द्या. त्यानंतर मटार वाफवून, स्मॅशरने किंवा मिक्सरमध्ये स्मॅश करुन घ्यायचे. मटारमध्ये किसलेले पनीर, चीझ, मीठ, आलं-मिरची-लसूण पेस्ट, धणे-जीरे पावडर, आमचूर पावडर किंवा चाट मसाला आणि कोथिंबीर घालावी. हे मिश्रण चांगले एकजीव करुन एका बाजूला त्याचे गोळे करुन ठेवावेत. आलू पराठा किंवा पुरणपोळीमध्ये ज्याप्रमाणे आपण सारण भरुन पोळी लाटतो त्याचप्रमाणे पोळीच्या आवरणात सारण भरुन पराठा लाटावा. तव्यावर तेल किंवा तूप घालून हा पराठा दोन्ही बाजुने खरपूस भाजावा. गरमागरम पराठा बटर, दही, सॉस किंवा लोणचे कशासोबतही अतिशय छान लागतो.