उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा थंडगार रॉयल मँगो फालुदा, जाणून घ्या रेसिपी

आंब्यामध्ये पोटॅशियम, प्रथिने आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळून येतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

  उन्हाळ्यात सगळीकडे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबे उपलब्ध असतात. फळांचा राजा म्हणून सगळीकडे आंब्याची ओळख आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला आवडतो. आंब्यापासून बनवलेले पदार्थ देखील चवीला छान लागतात. आंब्यामध्ये पोटॅशियम, प्रथिने आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आढळून येतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आज अशीच एक रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आंब्यापासून थंडगार रॉयल फालुदा कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

  साहित्य:

  तुळशीच्या बिया
  फालुदा शेव
  गुलाब सिरप
  आंब्याची प्युरी
  थंड दूध
  चिरलेला काजू
  मँगो आइस्क्रीम
  आंबा

  कृती:

  सर्वप्रथम मँगो फालुदा बनवण्यासाठी प्रथम तुळशीच्या बिया सुमारे 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर चाळणीतून गाळून बाजूला ठेवून घ्या. नंतर फालुद्याची शेव गरम पाण्यात टाकून शिजेपर्यंत उकडून घ्या. उकडून झाल्यानंतर शेवया बाजूला ठेवा. नंतर २ सर्व्हिंग ग्लासमध्ये 1 टेबलस्पून रोझ सिरप घाला आणि तुळशीच्या बिया घालून घ्या. नंतर त्यात २ ते ३ चमचे शिजवलेली फालूदा शेव घाला आणि वरून आंब्याची प्युरी घाला. प्युरी घालून झाल्यानंतर त्यात र्ध्या कपपेक्षा कमी दूध घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात २ ते ३ टेबलस्पून आंब्याचे तुकडे घाला. वरून सजावट करण्यासाठी एक स्कूप आइस्क्रीम आणि काही चिरलेला ड्रायफ्रुट्स घालून सजवून घ्या. तयार आहे रॉयल मँगो फालुदा.