घरच्या घरी बनवा चटकदार आणि कुरकुरीत ‘मसाला खाकरा’

  साहित्य :

  • तीन वाट्या कणिक
  • १ चमचा तिखट
  • १ चमचा हळद
  • चवीनुसार मीठ
  • आवडीप्रमाणे जिरेपूड
  • पाव चमचा ओवा
  • पाव वाटी तेल
  • एक चमचा हरभरा डाळीचे पीठ

   

  कृती :

  सर्व मिश्रण एकत्र करून कणिक भिजवावी. त्यानंतर त्यामध्ये तेल लावून चांगले मळावे. फुलक्यासाठी घेतो तेवढा गोळा घेऊन मध्यम जाडीची गोल पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर भाजावी.

  स्वच्छ कापड घेऊन त्याने पोळीवर दाब द्यावा. पोळी गुलाबी रंगाची होईपर्यंत भाजावी. याप्रकारे चटकदार आणि कुरकुरीत खाकरा तयार होईल. याचप्रमाणे पालक, टोमॅटो यांचा रस घालून देखील खाकरा करता येईल.