उन्हाळ्यामध्ये दिवसभर फ्रेश राहण्यासाठी घरी बनवा फ्रेश लाईम सोडा

उन्हाळा सुरु झाल्यानंतर उन्हाने सगळेच जण हैराण होतात. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर थंड काही पिण्याची इच्छा सगळ्यांना होते. बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.

  उन्हाळा सुरु झाल्यानंतर उन्हाने सगळेच जण हैराण होतात. उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर थंड काही पिण्याची इच्छा सगळ्यांना होते. बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन केले पाहिजे. थंड पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात थंडावा निर्माण होतो. फ्रेश लिंबू सोडा, लिंबू पाणी, कैरीचे पन्हे इत्यादी पदार्थ या दिवसांमध्ये प्याले जातात. हे पदार्थ पिण्यासाठी सगळ्यांचं आवडतात. यामुळे शरीराला आरोग्यदायी फायदे देखील होतात. पण तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि एनर्जेटिक असेल तर तुम्ही फ्रेश लाईम सोडा पिऊ शकता. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहते. हा सोडा तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता. चला तर पाहुयात लिंबू सोडा बनवण्याची रेसिपी.

  साहित्य :-

  अर्धा कप लिंबाचा रस
  ३ कप सोडा
  अर्धा कप साखर
  १ कप क्रश केलेला बर्फ
  चवीनुसार मीठ
  पुदिन्याची पाने

  कृती:-

  सर्वप्रथम लिंबू सोडा बनवण्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये लिंबाचा रस, सोडा, मीठ आणि साखर हे सर्व एकत्र करून घ्या. त्यानंतर हे सर्व पदार्थ विरघळेपर्यंत नीट मिक्स करून घ्या. साखर नीट विरघळून झाल्यानंतर हे मिश्रण एकत्र नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर एका ग्लासात तुमच्या आवश्यकतेनुसार बर्फाचे तुकडे टाकून घ्या. नंतर त्यात बनवलेले सर्व मिश्रण ओता. तयार आहे लिंबू सोडा. सजावट करण्यासाठी पुदिन्याची पाने वापरा. तयार आहे फ्रेश फ्रेश लाईम सोडा.