घरच्या घरा बनवा नीम साबण अगदी सोप्या पध्द्तीने

  कडूलिंबापासून (bitter lemon)बनवलेला नीम साबण विकत आणण्या ऐवजी या आयुर्वेदिक (ayur) साबणला (soap) तुम्ही घरच्या घरी (home)बनवू शकतात. यामुळे तूमच्या त्वचेला (skin) अनेक फायदे मिळू शकतात. इथे जाणून घेऊया साबण बनविण्याची पध्दती आणि त्याचे फायदे.

  अँटीऑक्सीडेंट्स, अँटीवायरल, अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल गुणांनीयुक्त नीम साबण केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या त्वचेसाठीही वरदान आहे. पावसाळ्यात पिंपल्स, रॅशेस, दाने इत्यादी भरपूर समस्या होतात. कडूलिंबामुळे या समस्यांवर मोठ्याप्रमाणात दिलासा मिळू शकतो. कडूलिंबाच्या (bitter lemon)  पानांना पाण्यात उकळून त्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेचे इंफेकशन कमी होण्यास मदत मिळते. पण रोजरोज हे पाणी बनविण्याचे कष्ट कोण घेणार? अशावेळी नीम साबणाने आंघोळ हा उत्तम उपाय आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या साबणावर विश्वास ठेवणे कठीण असते. त्यामुळे हा साबण तुम्ही स्वतः घरी बनवणे चांगला पर्याय ठरेल.

  साबण बनविण्याचे साहित्य

  • कडूलिंबाचा पाला (bitter lemon)
  • ग्लिसरीन साबण  (Glycerin soap)
  • व्हिटॅमिन ई च्या कॅपसूल
  • पाणी (water)
  • साबण बनवण्याचा साचा
  • जर साचा नसेल तर पेपर कप किंवा लहान वाटी.

   

  प्रथम कडूलिंबाचा पाला स्वच्छ धूवून घेत मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवून घ्यावी. आवश्यकतेनुसार पाणी टाकून फाईन पेस्ट बनवावी. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्यावी. ग्लिसरीन साबणाचे बारीक तुकडे करून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात लहान भांडे ठाऊन त्यात साबणाचे तुकडे टाकावे.  जेंव्हा हे तुकडे पुर्ण विरघळले की त्यात कडूलिंबाच्या पाल्याची पेस्ट टाकावी. व्हिटॅमिन ई च्या कॅपसूल टाकाव्या व थोड्यावेळ गरम होऊ द्यावे. नंतर हे लिक्वीड साच्यात घालून थंड होऊ द्यावे.