घरच्या घरी बनवा टोमॅटो जॅम, लहान मुलांना खूप आवडेल

सकाळच्या नाश्त्याला नेहमी पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खालले पाहिजेत. त्यामुळे पोट देखील भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

  रोज सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला नेमकं काय खायचं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. सकाळच्या नाश्त्याला नेहमी पौष्टिक आणि आरोग्यदायी पदार्थ खालले पाहिजेत. त्यामुळे पोट देखील भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळच्या वेळी अनेक लहान मुलांच्या शाळा असतात. तेव्हा त्यांना नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ बनवून देणं म्हणजे आईसाठी अवघड काम आहे. घाईघाईमध्ये सँडविच, पास्ता किंवा काहीतरी नवीन पदार्थ बनवला जातो. आम्ही तुम्हाला आज टोमॅटोपासून जॅम कसा बनवतात याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया..

  साहित्य:

  २ टोमॅटो
  हिरवी मिरची
  साखर
  मीठ वेलची पावडर
  तूप
  काजू

  कृती:

  टोमॅटो जॅम बनवण्यासाठी सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून एका टोपात १ ग्लास पाणी टाकून ते टोमॅटो उकडवून घ्या. ५ मिनिटांनी टोमॅटो शिजल्यावर गॅस बंद करून त्यातील पाणी काढून टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवा. टोमॅटो सोलून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि मीठ घालून चांगले बारीक करा. बारीक करून एका भांड्यामध्ये गाळून घ्या. त्यानंतर एका पॅनमध्ये टोमॅटो पेस्ट घालून चांगली उकळून घ्या. त्यानंतर टोमॅटोमधून कच्चा वास जाईपर्यंत टोमॅटो चांगले शिजवून घ्या. चांगली उकळी आल्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड घाला.नंतर पुन्हा एकदा एका टोपामध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यावर त्यात साल आणि काजू घालून गरम करून घ्या. त्यानंतर हे सर्व जॅमवर ओता. जर टोमॅटोचा रंग खूप चिकट असेल तर तुम्ही थोडा लाल रंग घालू शकता.