रात्रीच्या जेवणानंतर खाण्यासाठी घरीच बनवा मावा कुल्फी; पोटभर खा, अगदी सोपी आहे कृती

  मावा/खवा कुल्फी ही अनेकांची आवडती असते. त्यातच उन्हाळ्याच्या दिवसांत खायला फारच आवडते. दररोज लोक ते खाण्यासाठी बाजारात जातात, पण आता तुम्हाला तसे करण्याची गरज भासणार नाही. खाली दिलेल्या रेसिपीनुसार तुम्ही ते घरी सहज बनवू शकता. कमी साहित्य आणि अगदी सहजरित्या तुम्ही ही कुल्फी बनवू शकता.

  साहित्य:

  • ३ चमचे खवा/मावा
  • अर्धा लिटर फुल क्रीम दूध
  • १ टीस्पून कॉर्नफ्लोर
  • २ चमचे साखर
  • टीस्पून वेलची पावडर
  • एक चतुर्थांश कप पाणी
  • १ टीस्पून पिस्ता, लहाण काप केलेले

  अशी बनवा मावा/खवा कुल्फी

  • एका जाड तळाच्या भांड्यात दूध टाकून गॅसवर ठेवा. आच चालू करा.
  • उकळी आल्यावर आच मध्यम करा आणि घट्ट होईपर्यंत ढवळत रहा.
  • यास सुमारे १०-१५ मिनिटे लागतील.
  • चमच्याच्या मदतीने भांड्याभोवती दूध सोडत राहा जेणेकरून ते भांड्याला चिकटणार नाही.
  • आता पाण्यात कॉर्नफ्लोअर टाका आणि त्यात गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे मिक्स करा. ते कंडेन्स्ड दुधात मिसळा आणि ढवळत राहा जेणेकरून ते भांड्याला चिकटणार नाही. असे न केल्यास जळण्याची चव येते.
  • आता या मिश्रणात साखर, बदाम, पिस्ता, खवा आणि वेलची पूड घाला आणि सुमारे ५ मिनिटे ढवळत असताना शिजवा.
  • गॅस बंद करा आणि मिश्रण थंड होऊ द्या.
  • कुल्फीच्या साच्यात मिश्रण घाला आणि सेट होईपर्यंत ६ तास फ्रीजरमध्ये ठेवा.
  • आता चाकूच्या साहाय्याने साच्यातून कुल्फी काढा आणि त्याचे भाग करा आणि सर्व्ह करा.