badam barfi

आज आम्ही तुम्हाला शुगर फ्री बदाम बर्फी आणि शुगर फ्री फिरनीची रेसिपी सांगणार आहोत. या दोन्ही रेसिपी तुम्ही घरी अगदी सहज आणि कमी वेळेत बनवू शकता.

  स्वीट डिश ही बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या खास प्रसंगी अथवा सणाला बनवली व खाल्ली जाते. अनेक जणांना गोड पदार्थ खायला फार आवडतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच गोड पदार्थ खायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला फार आवडते. मात्र अनेक जणांना आरोग्याच्या काळजीने तसेच वजन वाढेल या भीतीने गोडाचे पदार्थ खाता येत नाहीत.

  अनेक गृहिणींना तर चविष्ट असे गोडाचे पदार्थ घरी कसे बनवायचे हेच ठाऊक नसते, म्हणूनच आज आम्ही अशाच काही खवय्यांसाठी रुचकर शुगर फ्री बदाम बर्फीची रेसिपी घेऊन आलो आहोत. ही बदाम बर्फी घरी अगदी सहज तसचं घरातील मुबलक साहित्यांपासून बनवली जाते. यासाठी अधिक वेळही लागत नाही, तसेच ही बर्फी आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. नॅचरल स्वीटनर वापरून घरच्या घरी मिठाई सहज बनवता येते. येथे आम्ही २ शुगर फ्री मिठाईच्या रेसिपी सांगत आहोत, ज्या तुम्हीदेखील घरात सहज ट्राय करू शकता.

  शुगर फ्री फिरनी रेसिपी

  साहित्य:

  १. तांदूळ
  २. छोटी वेलची
  ३. आर्टिफिशियल स्वीटनर
  ४. पिस्ता
  ५. बदाम
  ६. गुलाब इसेंस

  कृती:

  • शुगर फ्री फिरनी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुवून, त्यातील पाणी गाळून घ्या
  • नंतर एका ब्लेंडरच्या साहाय्याने तांदूळ घेऊन त्यात थोडे दूध घालून चांगले ब्लेंड करून घ्या
  • आता दुसऱ्या पातेल्यात दूध उकळा. आता त्यात बारीक केलेले तांदूळ घाला आणि नीट उकळवा
  • मंद आचेवर शिजवताना अधून मधून त्याला ढवळत राहा
  • मग सुमारे २०-२५ मिनिटे मंद आचेवर सर्वकाही नीट शिजवून घ्या. शेवटी यात वेलची पावडर आणि स्वीटनर घाला
  • आता तयार फिरनीमध्ये पिस्ता आणि गुलाबाचा इसेंस घाला आणि सर्व एकत्र करून टाका
  • आता तुमची शुगर फ्री फिरनी तयार आहे
  • जेवणानंतर तुम्ही या फिरणीचा आस्वाद घेऊ शकता

  शुगर फ्री बदाम बर्फीचे फायदे 

  बदाम बर्फी ही शुगर फ्री आणि हेल्दी मिठाई आहे. या बदाम बर्फीमध्ये अक्रोड, अंजीर आणि बदाम यांसारखे काही नट्स वापरले जातात. ही बदाम बर्फी चवी बरोबरच आरोग्यासाठी फायद्याची ठरते यात वापरले जाणारे बदाम पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. यासोबतच ते आपल्या केसांमध्ये आर्द्रता आणि चमक टिकवून ठेवते आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्येही फायदेशीर ठरते. ही बर्फी तुम्ही घरी अगदी झटपट बनवू शकता. जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

  साहित्य:

  १. मावा
  २. बदाम
  ३. सुका मेवा (अक्रोड, पिस्ता आणि अंजीर)
  ४. वेलची पावडर
  ५. जायफळ पावडर

  कृती:

  • शुगर फ्री बदाम बर्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅन किंवा कढईमध्ये मावा आणि बारीक केलेले बदाम एकजीव करा
  • हे सर्व साहित्य नीट मिक्स करा आणि अधूनमधून त्यांना ढवळत राहा
  • त्यांना मध्यम आचेवर ५ मिनिटे परतून घ्या
  • आता मिक्स केलेले काजू, वेलची पावडर आणि जायफळ पावडर यात घाला. त्यांना चांगले एकजीव करा
  • एका प्लेटला तूप लावून तयार मिश्रण प्लेटवर चांगले पसरवा
  • त्यानंतर याला चांगले थंड करून घ्या. थंड होण्यासाठी किमान ४ ते ५ तास तसेच ठेवा
  • बर्फी व्यवस्थित सेट झाल्यावर त्याचे समान तुकडे करा. तुमची बदाम बर्फी तयार आहे. तुम्ही या बदाम बर्फीवर गुलाबाच्या पाकळ्यांनी सजावट करू शकता