श्रावणाला सुरुवात होताच मंगळागौर शिकवणी वर्गाला पसंती

    मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी (Tuesday Mangala Gauri) नवविवाहीत महिलेने (Shravan begins the newlyweds celebrated) लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम (love) व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी, या हेतूने ही पूजा (puja) केली जाते. कोरोना मुळे गेली दोन (two) वर्ष (year) बऱ्याच जणांची मंगळागौर (Mangala Gauri)ही घरीच झाली. तर काही महिलांनी ती गृप सोबत ऑनलाईन साजरी केली. आता श्रावण सुरु झाल्याने, सगळी कडे प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी (Mangala Gauri started) केल्या जात आहे.

    नवविवाहित महिलांनी (newly married) श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करायचे आणि रात्री देवीची आरती म्हणून पारंपरिक मंगळागौर खेळ खेळण्याचा प्रघात आहे. या खेळाविषयी माहिती देतांना, घरातील स्वयंपाक घरात जी साधने तसेच भाज्यांच्या वापर होतो त्याची ओळख या खेळाच्या माध्यमातून दिली जाते. उदाहरणार्थ फुगड्या (fugdi) चे आठ ते दहा प्रकार आहेत. यामध्ये तवा फुगडी, कमळ, फुलपाखरू फुगडी. तसेच भाज्यांशी ओळख देणारे अवल्या वेचू की गवल्या वेचू, लाट्या बाई लाट्या, तर सासू सूनेच तुझी आई मोठी की मोठी आई, आदी ५० ते ६० खेळ यावेळी खेळत असल्याचे अपर्णा यांनी सांगितले.

    या खेळाच्या (game) पूर्व तयारीसाठी सराव करणे खूप आवश्यक असते. शरीराची उर्जा (baby) वाढवण्यासाठी गृप मधील नौकरी करणाऱ्या महिला, घर सांभाळून दिवसाला दोन तास सरावासाठी देतात. साधारणपणे मे अखेर पासून सरावाला सुरवात करत असल्याचे त्या सांगत आहेत. श्रावणात दिवसाला दोन खेळांच्या सत्रांचे बुकींग त्या घेतात. सृजनसख्या मंगळागौरी गृपच्या अपर्णा मोडक या वीस वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात आहेत.