marlee liss forgave her rapist and now helps other survivors of sexual assault heal nrvb
रेप करणाऱ्या समोर बसून ती ४ तास गप्पा मारत होती, त्यानंतर घडलं असं की...

रेस्टोरेटिव जस्टिव प्रोसेस एका मेडिटेशन सर्कलच्या रुपात आयोजित करण्यात आली होती, या ठिकाणी पीडितेची आई, बहीण, तिची एक मैत्रीण, दोन मेडिटेटर्स, दोन वकील आणि स्वत: दोषी उपस्थित होता.या ठिकाणी ८ तास सर्वांसमोर तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला आणि शेवटी या घटनेमुळे तिच्या आयुष्यात या गोष्टीचा किती वाईट प्रभाव पडला आहे असं लिसाने सांगितलं.

लैंगिक हिंसेला बळी पडलेली कॅनडाची २५ वर्षांची मार्ली लिस आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर आज महिला अत्याचार आणि हिंसेने पीडित महिलांची मदत करत आहे. ओंटोरिया निवासी मार्ली लिस म्हणते की, तिचा पूर्ण जोर हा अपराध्याला शिक्षा देण्याऐवजी पीडितांना आधार आणि त्यांना नव्याने आयुष्यात उभं करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे.

कॅनडाच्या स्थानिक प्रसारमाध्यामांनी दिलेल्या अहवालानुसार, मार्ली लिसने २०१९ मध्ये (रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस) तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्याचा ४ तासांपर्यंत सामना केला होता. लिसने तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या त्याला माफ केलं. भूतकाळातील वाईट प्रसंगांना तिलांजली देऊन पुढे चालत राहणं ही काळाची गरज आहे असं ती सांगते. तेव्हापासून आजतागायत आपल्यासारख्याच लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांना मदत करण्याचा तिने विडा उचलला आहे.

लिसने CTVNews.caला दिलेल्या टेलिफोनवर दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणते, मला आजवर जवळपास ४० महिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. एखाद्या महिलेसोबत तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगानंतर तिचे उपचार, इतरांच्या नजरेतून उतरणे, स्वत:च्या शरीरावर प्रेम करायला शिकणे आणि पितृसत्ताक व्यवस्थेला छेद देणं यासारख्या बाबींबर काम करते. स्वानुभव कथन करताना लिस म्हणते, न्यायालयाची प्रक्रिया ही हिंसेहूनही अधिक क्लेशदायक आहे, आपण या दु:खातून सावरूच शकत नाही.

वकिलाद्वारे हल्लेखोरासोबत प्रतिवाद करणं म्हणजे आपणच पीडित असल्याची सासत्याने जाणीव करून देत असतो. लैंगिक अत्याचार करणाऱ्याने तिच्यासोबत असं का केलं हेच फक्त लिसाला जाणून घ्यायचं होतं. लिसा म्हणते, जर तिला रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस विषयी आधीच माहिती असतं तर ती न्यायालयाची कारवाई होण्यापूर्वी स्वत:ला या आघातांपासून वाचवू शकली असती.

रेस्टोरेटिव जस्टिव प्रोसेस एका मेडिटेशन सर्कलच्या रुपात आयोजित करण्यात आली होती, या ठिकाणी पीडितेची आई, बहीण, तिची एक मैत्रीण, दोन मेडिटेटर्स, दोन वकील आणि स्वत: दोषी उपस्थित होता.या ठिकाणी ८ तास सर्वांसमोर तिने तिच्यावर गुदरलेला प्रसंग कथन केला आणि शेवटी या घटनेमुळे तिच्या आयुष्यात या गोष्टीचा किती वाईट प्रभाव पडला आहे असं लिसाने सांगितलं.

जेव्हा लिसला विचारण्यात आलं की, दोषी सध्या काय करतोय, जर तिला हे जाणून घ्यायचं असेल तर कायद्यातही तशी तरतूद आहे. यावर लिसा म्हणते तिला याविषयी जाणून घेण्यात काडीचात्र स्वारस्य नव्हते. दोषीबाबत सातत्याने विचार करून करून तिच्या जखमेवरची खपली काढण्यासारखं आहे असं ती म्हणते. लिसने ‘री ह्युमनाइज’ नावाची संस्थाही सुरू केलीये, जी लैंगिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करते.

कॅनेडियन न्याय विभागाच्या मते, रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस ही गुन्ह्यांच्या नुकसान भरपाईवर आधारित आहे. या प्रक्रियेअंतर्गत अपराधानंतर पीडित पक्षाच्या गरजांची माहिती घेऊन त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या संस्थेत महिलांना अशा प्रकारच्या हिंसेला बळी पडल्यानंतर स्वत:च्या शरीरावर प्रेम कसं करायचं याचं प्रशिक्षण देते. यासाठी ती विविध कार्यक्रम आणि कार्यशाळांच्या माध्यमातून या सर्व गोष्टी करते असं तिने स्पष्ट केलं.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून लिस हिंसेनंतर दु:ख आणि आत्मसंयम ही कला शिकवते. आपल्यासोबत झालेल्या हिंसेनंतर लिसला दु:ख आणि आत्मसंयम यांना कसं सामोरं जायचं हे शिकून घ्यावं लागलं होतं. तिच्या कार्यक्रमांत आभासी समर्थन, मार्गदर्शित ध्यान आणि स्थानिक लैंगिक अत्याचार संसाधनांसाठी कनेक्टिव्हिटी यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे.

स्टॅटिस्टिक कॅनडा सर्वेक्षण १८ नुसार १५ वर्षाच्या १० दशलक्षाहून अधिक मुली शारीरिक छळ किंवा लैंगिक हिंसाचाराला बळी पडल्या आहेत. स्टॅटकन यांनी दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, लैंगिक हिंसाचारात पीडित असलेल्या प्रत्येक पाच व्यक्तींमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोन्ही असतात. यापैकी बर्‍याच घटनांची माहिती पोलिसांना दिलीच जात नाही.

लिसची इच्छा आहे की, बलात्काराच्या प्रत्येक पीडिताला हे माहित असले पाहिजे की ‘क्रिमिनल जस्टिस सिस्टम’ हा एकमेव पर्याय नाही. लैंगिक अत्याचार पीडितांना त्यांच्या पर्यायांची जाणीव करून देणं म्हणजेच न्याय व्यवस्थेत काम करणाऱ्यांना शिक्षित करण्यापासून सुरुवात करण्यासारखं आहे असं लिस सांगते. रेस्टोरेटिव जस्टिस प्रोसेस सर्वांसाठी नाही पण, न्यायव्यवस्थेत काम करणाऱ्या शिक्षित केल्याने ही अधिक सुलभ होईल.