यंदा होळी खेळताना तुमची त्‍वचा व केसांचे संरक्षण करण्‍याचे उपाय

विषाणूपासून आपल्‍या स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासाठी सर्व आवश्‍यक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, तसेच आपण आपली त्‍वचा व केसांचे अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया, पुरळ आणि केस कोरडे होण्‍यासोबत केसांचे झुलपे होणे यापासून संरक्षण करणे देखील आवश्‍यक आहे.

  डॉ. स्‍मृती नस्‍वा सिंग

  होळी हा रंगांचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सद्यस्थिती पाहता आपण सर्वांनी फक्‍त आपले जवळचे कौटुंबिक नातेवाईक व मित्रांसोबत जबाबदारीने व काळजीपूर्वक होळी सण साजरा करण्‍याच्‍या योजना केल्‍या असतील. मुंबईमध्‍ये कोविड-१९ केसेसच्‍या वाढत्‍या प्रमाणादरम्‍यान होळीचे रंग आपले मन, मूड्समध्‍ये नवचैतन्‍य आणतील आणि आपल्‍याला उत्‍साहित करतील.

  विषाणूपासून आपल्‍या स्‍वत:चे संरक्षण करण्‍यासाठी सर्व आवश्‍यक नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, तसेच आपण आपली त्‍वचा व केसांचे अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया, पुरळ आणि केस कोरडे होण्‍यासोबत केसांचे झुलपे होणे यापासून संरक्षण करणे देखील आवश्‍यक आहे.

  खालील लहान उपाय केस व त्‍वचेचे नुकसान होण्‍यापासून आणि कोणतीही चिंता न करता सणाचा आनंद घेण्‍यामध्‍ये मदत करू शकतात.

  होळी खेळण्‍यापूर्वीची तयारी: सणाच्‍या दिवशी त्‍वचेचे संरक्षण करणे हे पुरेसे नसणार. इष्‍ट परिणमांसाठी सणाच्‍या काही दिवस अगोदरपासूनच विशिष्ट खबरदारी घेता येऊ शकते.

  • होळी सणाच्‍या एक आठवड्यापूर्वी व होळी सण साजरा केल्‍यानंतर ब्‍लिचिंग/बॅक्सिंग/फेशियल करणे टाळा.
  • त्‍वचेवर तेल किंवा पेट्रोलियम जेली किंवा कोल्‍ड क्रीमचा जाड थर लावा – ओठ, कानामागील भाग, बेंबीचा भाग विसरू नका.
  • केस व दाढीला देखील जास्त प्रमाणात तेल लावा.
  • दिवसा बाहेर जाण्‍याच्‍या ३० मिनिटे अगोदर अधिक प्रमाणात सनस्क्रिन लावावे आणि दीर्घकाळापर्यंत दिवसभर बाहेरच राहणार असाल तर दर ३ तासांनी सनस्क्रिन लावावे.
  • होळीच्‍या रंगांमुळे नखांवर निळे व हिरवे डाग दिसू शकतात, यापासून संरक्षणासाठी नेल पॉलिश चांगला उपाय आहे.

  होळी खेळताना:

  • सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करा, मास्‍क घालणे अनिवार्य आहे.
  • सुक्‍या सेंद्रिय रंगांचा वापर करा.
  • सोनेरी व चंदेरी रंगांचा वापर टाळा.
  • अधिक प्रमाणात शारीरिक संपर्क टाळा.
  • दाह किंवा जळजळ जाणवल्यास रंग धुवून टाका.
  • मॉइश्‍चरायझर जवळ असल्‍यास उपयुक्‍त – मॉइश्‍चरायझर्स ओल्‍या त्‍वचेवर उत्तम काम करतात, म्‍हणून त्‍वचा पाण्‍याने ओली करा आणि त्‍यावर मॉइश्‍चरायझर लावा.
  • दाह होत असल्‍यास त्‍यावर बर्फ लावा किंवा पाण्‍याचे थेंब शिंतडा आणि त्‍यानंतर मॉइश्‍चरायझर लावा.
  • स्‍वत:ला हायड्रेटेड ठेवा – भरपूर प्रमाणात पाणी पिल्‍याने त्‍वचेला सखोल पोषण मिळते.
  • अधिक प्रमाणात मद्यपान करणे टाळा.

  होळी खेळल्‍यानंतरची स्‍वच्‍छता:

  • ओले व सुके कपडे वेगळे ठेवा.
  • उबदार पाण्‍याने आंघोळ करा.
  • उबटनचा वापर करा – मुल्‍तानी मातीपासून बनवलेले पॅक्‍स किंवा गव्‍हाचे पीठ, दही, हळद यांचे मिश्रण रंग काढण्‍यासाठी संपूर्ण शरीरभर लावल्‍यास उत्तम फायदा होतो. यामुळे त्‍वचा अधिक कोरडी न पडण्‍याची खात्री मिळते, तुलनेत साबणाचा वापर केल्‍यास त्‍यामधील डिटर्जंटमुळे त्‍वचा कोरडी पडू शकते.
  • विशेषत: चेहऱ्यासाठी कोमट पाण्‍यासह शुद्ध दूधाचा वापर करा आणि हे सोल्‍यूशन उबटननंतरच्‍या दुस-या वॉशसाठी वापरता येऊ शकते.
  • रंग काढण्‍यासाठी मीठ, ग्लिसरिन व अरोमा तेल हे देखील उपयुक्‍त आहेत.
  • रंग ओरखडून काढण्‍याचा प्रयत्‍न करू नका. विशेषत: चेहऱ्यावर पुरळ व खळगे असलेल्‍या व्‍यक्‍तींनी ओले असतानाच उबटन काढून टाका.
  • टाळू स्‍वच्‍छ धुण्‍यासाठी केस शॅम्‍पूने धुणे आवश्‍यक आहे आणि कंडिशनर केसांना कंडिशन व मॉइश्‍चर करण्‍यामध्‍ये मदत करेल आणि केसांचे झुलपे होणे रोखेल.
  • त्‍वचेसाठी आंघोळीनंतर मॉइश्‍चरायझरचा वापर आणि केसांसाठी सीरमचा वापर उपयुक्‍त आहे.

  (लेखिका मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात कन्‍सल्‍टण्‍ट डर्माटोलॉजिस्‍ट व कॉस्‍मेटिक डर्माटोलॉजिस्‍ट आहेत.)