पुरुषांनी करा ‘हे’ रोज आसन; तुमच्या जीवनशैलीत होतील मोठे बदल  

    अनेक वेळा पुरूष आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत, तसेच लग्नानंतर महिलांवरच नव्हे तर पुरुषांवरही अनेक जबाबदाऱ्या येतात, याचा परिणाम म्हणजे, पुरुषांनाही वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यां निर्माण होणाऱ्य़ास सुरुवात होते. यासाठी पुरुषांसाठी हे आसान फार उपयोगी ठरेल.

    हे आसान तुम्ही तुमच्या जीवनशैलीत समावेश केल्यास आरोग्याच्या काही समस्या दूर होण्यास मदत होईल.  फुलपाखरू हे पुरुषासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे आसान करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर चटई टाकून बसावे लागेल.  आता तुम्हाला तुमच्या दोन्ही पायांचे तळवे एकत्र ठेवावे लागतील.

    आता दोन्ही पायाचे अंगठे हे हातांनी घट्ट पकडून ठेवा. शेवटी फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मांड्या वर करून खाली करा. या स्थितीत ही प्रक्रिया काही वेळ करा. म्हणजे २० ते ३० हि क्रिया सुरु ठेवा.  या क्रियेमुळे अंतर्गत स्नायू बळकट होतात आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंच्या वेदना कमी होतात. तसेच गुडघेदुखीमध्येही आराम मिळेल. रोगप्रतिकारशक्तीही वाढण्यास मदत होते.