अजमल परफ्युम्सचे एमआयआय फ्रेग्रन्सेस

फ्रेग्रन्सेस घडवण्याच्या ७० वर्षांतील स्मृती साजऱ्या करण्यासाठी, आवाक्यातील दरांत आणत आहे, ५ सुवासिक समूहांचे विश्व या श्रेणीच्या माध्यमातून आम्ही सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कौशल्य, अनुभव व घटकपदार्थ भारतातील मिलेनिअल्स आणि जेन झेडसाठी आणत आहोत

  मुंबई: अजमल परफ्युम्स (Ajmal Perfumes) या एतद्देशीय पर्फ्युमरी ब्रॅण्डने ७० वर्षांच्या अनुभवातून प्राप्त केलेल्या समृद्ध वारशाच्या जोरावर जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. आपल्या सुगंधांच्या विस्तृत श्रेणीसाठी हा ब्रॅण्ड ओळखला जातो. ब्रॅण्डचे संस्थापक हाजी अजमल अली यांनी १९५१ मध्ये हा ब्रॅण्ड स्थापन केला आणि गेल्या सात दशकांपासून ब्रॅण्ड अनेक स्मृती घडवत आहे. औध आणि औध तेलाचे व्यापारी म्हणून हाजी अजमल अली यांनी त्यांचे पहिले दुकान मुंबईत १९६०च्या दशकात सुरू केले.

  आज अजमल परफ्युम्सची उत्पादने ४५ देशांतील, २४० एक्स्लुजिव स्टोअर्समधून तसेच भारतातील ३००० पॉइंट्स ऑफ सेल्सवरून उपलब्ध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला अजमलने ब्रॅण्‍ड हाउस ऑफ अनिता डोंगरे यांच्‍याशी सहयोग करून अँड व ग्लोबल देसी यांच्यासाठी समकालीन परफ्युम्‍सची श्रेणी बाजारात आणली.

  आपला ७० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी अजमल परफ्युम्स, एमआयआय फ्रॅग्रन्सेस ही खास भारतातील मिलेनिअल्स व जेनझेडसाठी विकसित केलेली श्रेणी बाजारात आणत आहे. डिजिटल जगातील रहिवासी असलेल्या तसेच सहज स्पर्श करता येईल अशी चौकस वृत्ती असलेल्या मिलेनिअल्स जेनझेड ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून, ब्रॅण्डने सुगंधांची एक श्रेणी विकसित केली आहे. या विभागाला चालना देणाऱ्या प्रयोगशील ग्राहकांना डोळ्यापुढे ठेवून हे परफ्युम्‍स विकसित करण्यात आले आहेत. या सुवासांच्या श्रेणींमध्ये ब्रॅण्डचे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य, अनुभव व घटक पदार्थ यांचा मेळ साधण्यात आला आहे, तरीही ही उत्पादने परवडण्याजोग्या दरांमध्ये उपलब्ध आहेत.

  “ब्रॅण्डच्या दृष्टीने महत्त्वाचे वर्ष साजरे करण्यासाठी लग्झरी फ्रॅग्रन्सेस परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करून देणे हे आमच्या ब्रॅण्डपुढील उद्दिष्ट होते. सुवासांचा उपयोग खास प्रसंगीच करणे ते परफ्युम्सचा समावेश दररोजच्या तयार होण्यामध्ये करणे हा प्रवास भारतीय मिलेनिअल्स आणि जेन झेड ग्राहकांनी केला आहे. चित्तवृत्तींना अर्थात मूड्सना साजेसे सुवास वापरणे हा प्रवाह नवीन आहे पण तो लवकरच सर्वत्र पसरणार आहे, असा माझा अंदाज आहे. प्रत्येक परफ्युम हा आपल्या छटांच्या माध्यमातून विशिष्ट चित्तवृत्ती जागवतो तसेच एक उद्दिष्ट साध्य करतो,” असे अजमल अँड सन्स- इंडियाचे बिझनेस मेंटॉर व परफ्युमिस्ट अब्दुल्ला अजमल सांगतात.

  अजमल परफ्युम्सने एमआयआय श्रेणी विकसित करताना ग्राहकांची मनोवृत्तीही विचारात घेतली आहे. तुम्ही कोणत्या रंगांकडे आकर्षित होता आणि कोणत्या सुगंधांच्या छटांकडे आकर्षित होता, यामध्ये संबंध असतो हे स्पष्ट आहे. म्हणूनच आजच्या डिजिटल युगात जेव्हा लोक स्क्रीनवर बघतात व ऑनलाइन पद्धतीने फ्रेग्रन्सेस ऑर्डर करतात, तेव्हा पॅकेजिंग हा त्यांना स्पर्श करणारा पहिला घटक असतो. म्हणूनच ब्रॅण्डला बाटलीचे स्वरूप व संपृक्तता (सॅच्युरेशन) यांबद्दल स्पष्ट असणे गरजेचे वाटते.
  ५ मौल्यवान खड्यांचा संदर्भ घेऊन बाटल्या तयार करण्यात आल्या आहेत, प्रत्येक बाटलीच्या रंगाला खास व्यक्तिमत्त्व आहे आणि ती वैशिष्ट्यपूर्ण चित्तवृत्ती खुलवणारी आहे. काचेच्या चौकोनी बाटल्या आकर्षक व मजबूत घडवण्यात आल्या आहेत. तुम्ही त्या कपाटातील शेल्फवर ठेवू शकता किंवा त्यांना डेस्कच्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता किंवा पिशवीत भरूनही ठेवू शकता. सौंदर्य व कार्यात्मकता यांचा हा लाभदायी संयोग आहे. अजमल अँड सन्स-एनएचए डिव्हिजन, इंडियाचे अध्यक्ष (ऑपरेशन्स) सौरव भट्टाचार्य धोरण स्पष्ट करताना सांगतात, “भारतातील मिलेनिअल्स व जेन झेड ग्राहक फॅशनच्या बाबतीत खूपच पुढे आहेत. आमच्या उद्योगातील प्रवाहांना नवीन आकार देण्यामागे याच पिढीची चालना आहे आणि म्हणून सुगंधांची ही श्रेणी सशक्त लिटमस चाचणी ठरणार आहे.

  उत्तम परफ्युम हा या ग्राहकांच्या तयार होण्यातील (ग्रूमिंग) महत्त्वाच्या भाग असल्याने अजमल परफ्युम्सला एमआयआय रेंज आणणे क्रमप्राप्तच होते. अजमल पूर्वीपासून, ७० टक्के उत्पादने आपल्या दुबईतील अत्याधुनिक उत्पादन कारखान्यातून आयात करत असे. या श्रेणीसह आम्ही उत्पादन भारतात आणले आहे. त्यामुळे विविध आयात शुल्कांमध्ये सुमारे ३५ टक्के बचत झाली आहे आणि पर्यायाने ग्राहकांना अधिक चांगले दर-मूल्य समीकरण देणे आम्हाला शक्य झाले आहे तसेच ‘आत्मनिर्भर’ अभियानालाही आमचा हातभार लागला आहे. या श्रेणीमध्ये लग्झरी परफ्युम्सचे सगळे गुणधर्म सामावलेले असले, तरी १०० मिली ईडीपी १५०० रुपये एवढ्या परवडण्याजोग्या दरात उपलब्ध आहे.”

  भारतातील मिलेनिअल्स व जेन झेड ग्राहकांना दर्जा, पारदर्शकता व लिंगनिरपेक्ष (जेंडर-न्युट्रल) सुवास हवे आहेत आणि एमआयआय रेंजमध्ये या सगळ्याचा अंतर्भाव करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. रिटेल दृष्टिकोनातून, ऑनलाइन विक्रीसाठी ही उत्पादने सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे आणि ऑफलाइन विक्रीसाठी, २०२२च्या अखेरीपर्यंत, ४०००हून अधिक ठिकाणांपर्यंत व्यवसायाचा विस्तार करण्याची ब्रॅण्डची योजना आहे. यामध्ये कपड्यांची मल्टी-ब्रॅण्ड आउटलेट्स, ब्युटी स्टोअर्स आणि अजमलच्या स्वत:च्या मालकीचे स्टोअर्स यांचा समावेश होतो.”

  एमआयआय रेंज:

  १. अजमल इंडिया नीआ यू डी परफ्युम फॉर विमेन

  मूड: अभिजात प्रणय

  फ्रॅग्रन्स फॅमिली: फ्लोरल मस्क

  नीआच्या सौम्य व दिमाखदार मिश्रणामध्ये फुलांचा सुवास आहे. सुरुवातीला हा सुवास काहीसा आंबूस व पाण्यासारखा भासतो आणि नंतर व्हायोलेट्स, गुलाब आणि लिलीचा परफ्युम यातून येतो. सेडरवूड आणि व्हाइट मस्क हे मुलभूत सुवास यात आहेत. त्यामुळे या सुगंधाला एक स्थैर्य प्राप्त झाले आहे. तसेच हृदयाला सुखावणारा सूक्ष्म गंध यात आहे. त्यामुळे हा सुवास दीर्घकाळ रेंगाळत राहतो.

  मॅच द मूड:

  तुम्हाला खूप मोठे वादळ निर्माण न करता त्या क्षणाच्या प्रवाहात मिसळून जायचे असेल, तर नीआ वापरा. दिवसा वापरण्यासाठी हा सुवास उत्तम आहे!

  २. अजमल इंडिया एरीथा यू डी परफ्युम फॉर विमेन

  मूड: प्रसन्न आत्मविश्वास

  फ्रॅग्रन्स फॅमिली: फ्रुटी फ्लोरल

  रसाळ पीच आणि ताज्या पेअरच्या गंधामुळे या फळा-फुलांच्या मिश्रणाला एक हलका-फुलका ताजेपणा आला आहे. या गंधांमध्ये नंतर हनीसकलच्या गोडसर वासासह बल्गेरियन गुलाब, मस्क व वाळ्याचा सुवास मिसळतो आणि आनंदी भावना जागवणारा एक फळा-फुलांचा सुवास तयार होतो. अत्तरे तयार करण्याच्या क्षेत्रामध्ये हनीसकलच्या गोड आणि घ्राणेंद्रियांसाठी उबदार भासणाऱ्या गुणवैशिष्ट्याचा उपयोग केला जातो. त्यामुळे या सुगंधाच्या बाटलीकडे बघताच सूर्यप्रकाशाची आठवण होते.
  मॅच द मूड: तुम्हाला तुमचा आत्मविश्वास व्यक्त करायचा असेल आणि तेजाने चमकायचे असेल तेव्हा एरीथा वापरा.

  ३. अजमल इंडिया प्रोज यू डी परफ्युम फॉर मेन

  मूड: जादुई शक्ती

  फ्रॅग्रन्स फॅमिली: फॉग्युर अरोमॅटिक

  लाकडाच्या ताज्यातवान्या सुवासासह, प्रोज व्यक्तिमत्त्व व सुसंस्कृतता दाखवतो. सुरुवातीला यात लिंबू, मँडरिन व स्पीअरमिंटचा गोडसर ताजा वास प्रकर्षाने जाणवतो आणि त्यानंतर लवेंडर व बडीशेपेचा सुखद सुवास रेंगाळत राहतो. या अत्तराचा मुलभूत घटक चामडे (लेदर) हा आहे. चामड्याचा सुवास अत्तराला स्थैर्य व दिमाख देतो आणि त्याचबरोबर त्याचा ताजेपणा कायम राखतो.

  मॅच द मूड:

  तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास आणि छाप टाकण्यास सज्ज असाल, तेव्हा प्रोज वापरा.

  ४. अजमल इंडिया यर्न यू डी परफ्युम फॉर मेन

  मूड: खेळकर सहजता

  फ्रेग्रन्स फॅमिली: अरोमॅटिक अॅक्वाटिक

  यर्न हा सुवास तुम्हाला समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीची आठवण करून देईल. लाटांचे सामर्थ्य आणि महासागराची विस्तीर्णता यांच्यापासून प्रेरणा घेऊन तयार केलेले हे आधुनिक जलाधारित अत्तर आहे. यात लिंबू, पुदिना व जलवनस्पतींच्या टोकदार ताजेपणाचा घमघमाट आहे. अत्तराच्या केंद्रस्थानी लवेंडरचा चित्तवृत्ती उंचावणारा स्वच्छ, धारदार सुवास आहे आणि मुलायम लोकरीच्या प्रसन्न गंधाच्या छटाही आहेत. अत्तराचा पाया मखमली व मातीचा स्पर्श असलेल्या लाकडांचा सुवास तसेच अँबर वूड, पचौली व मस्कचा सुवास आहे. यामुळेत्याचा गंध दीर्घकाळ रेंगाळत राहतो.

  मॅच द मूड:

  जेव्हा तुम्ही काम, भटकंती, पार्टी , सोलो ट्रेक्स यांसारखे वेगवेगळे उपक्रम एकाच दिवशी करता आणि तो दिवसभर अखंड ताजा सुवास अंगाला येत राहावा असे तुम्हाला वाटते, तेव्हा यर्न वापरा.

  ५. अजमल इंडिया असेंड यू डी परफ्युम, जेंडर न्युट्रल

  फ्रॅग्रन्स फॅमिली: फ्रुटी ओरिएंटल

  मूड: उत्साही संध्याकाळ

  हा मादक, कामुक, मोहक गंध तुमच्या नेहमीच्या पौर्वात्य सुगंधांसारखा नाही. पाण्याचा ताजेपणा आणि व्हॅनिला, अँबर व पचौलीच्या सखोल गुणधर्मांना उजळून टाकणारा द्राक्षाचा घमघमाट यांचा हा आधुनिक व अभिजात अवतार आहे. मौजमजा आवडणाऱ्या, उत्साहाने सळसळणाऱ्या व्यक्तींच्या घ्राणेंद्रियांना आकर्षित करेल अशा पद्धतीने विकसित करण्यात आलेला असेण्ड तुमच्या संध्याकाळच्या उत्साहात कधीच उणेपणा येऊ देणार नाही.

  मॅच द मूड: संध्याकाळच्या कार्यक्रमांमध्ये किंवा जवळच्या संमेलनांमध्ये तुम्हाला तुमचे अस्तित्त्व जाणवून द्यायचे असेल, तेव्हा असेंड वापरा.

  किंमत: १०० मिली १५०० रुपयांना, २० मिली ६०० रुपयांना

  हे सुवास in.ajmalperfume.com वर तसेच थर्ड पार्टी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आणि भारतातील अजमल किओस्क व स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.