misal

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली मिसळ आता जगासाठीही आकर्षणाचा विषय ठरली आहे. जगातील 50 पारंपारिक विगन (Vegan) पदार्थांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मिसळ ही अकराव्या स्थानावर आहे.

    महाराष्ट्रात मिसळ(Misal) कुठल्याही शहरातली असो तिचा आनंद खवय्ये अगदी मनापासून घेत असतात. महाराष्ट्रात मिसळ हा लोकांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली मिसळ आता जगासाठीही आकर्षणाचा विषय ठरली आहे. जगातील 50 पारंपारिक विगन (Vegan) पदार्थांची यादी टेस्ट एटलासकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात मिसळ ही अकराव्या स्थानावर आहे. त्यामुळे आता मिसळ विगन पदार्थ म्हणून सुद्धा आवडीने खाता येईल.(50 Traditional Vegan Food List)

    मिसळ आणि खवय्ये प्रेमींचे एक वेगळे नाते आहे. त्यात मिसळ आता विगन पदार्थांच्या यादीत सामील झाल्यामुळे तिचं महत्त्व जागतिक पातळीवर देखील खूप वाढणार, यात अजिबात शंका नाही.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by TasteAtlas (@tasteatlas)

    मिसळ विगन कशी?
    विगन पदार्थ म्हणजे, दुधापासून किंवा प्राण्यांपासून तयार न झालेले पदार्थ. मग यात आता मिसळ कशी? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. उत्तर अगदीच सोपं आहे. मिसळमध्ये बटाट्याची भाजी, कडधान्यांचा रस्सा, त्यावर फरसाण, कांदा आणि लिंबू अशी सर्वसाधारण मिसळ तयार केली जाते. पण यातले कोणतेही पदार्थ हे दूधापासून तयार होत नाहीत. मिसळ हा शाकाहारी पदार्थ त्यामुळे याचा प्राण्यांशी किंवा मांसाहाराशी संबंधच येत नाही. राहीला प्रश्न पावाचा किंवा ब्रेडचा जो मिसळ सोबत खाल्ला जातो. पाव किंवा ब्रेड हे मैद्यापासून तयार केले जातात आणि त्यात इस्ट वापरलं जातं. त्यामुळे इथेही दुधाचा कोणताही समावेश होत नाही. या सर्व गोष्टींमुळे मिसळ ही जगाच्या 50 पारंपारिक विगन पदार्थांच्या यादीत जाऊन बसली आहे.

    अनेक भारतीय पदार्थांचा 50 विगन पदार्थांच्या यादीत समावेश
    भारतीयांसाठी महत्त्वाची बाब म्हणजे या यादीत फक्त मिसळ नसून इतरही काही पारंपारिक भारतीय पदार्थ आहेत. आलू गोबी, गोबी मंच्युरिअन, मसाला वडा, भेळपुरी, राजमा चावल या पदार्थांचा समावेश आहे. यामध्ये आलू गोबी 20 व्या स्थानावर, गोबी मंच्युरिअन 24 व्या स्थानावर, मसाला वडा 27 व्या स्थानावर, भेळपुरी 37 व्या स्थानावर तर राजमा चावल 41 स्थानावर आहे.

    त्यामुळे आता तुम्ही वेगन जरी असाल तरी हे पदार्थ तुम्ही अगदी बिंधास्तपणे खाऊ शकता. सोबतच त्याचा मनमुराद आनंददेखील घेऊ शकता.