तब्बल ३७ वर्षानंतर लँड झाले गायब झालेले विमान; टाइम ट्रॅव्हलची चर्चा!

विमान बेपत्ता झाल्यानंतर ३७ वर्षांनी एक चमत्कार घडला, पोर्टो अलेग्रे विमानतळावरील नियंत्रण प्रणालीवर कर्तव्यावर असलेल्या नियंत्रकांना अचानक एक मोठे विमान त्यांच्या रडारच्या हद्दीत येताना दिसले...

  जगात रहस्यमयी घटनांची कमतरता नाही. बऱ्याचदा अशी काही रहस्य समोर येतात जी विज्ञानासाठीही आव्हानात्मक असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका आश्चर्यकारक गोष्टीबद्दल सांगणार आहोत. ज्या रहस्याबद्दल सांगणार आहोत ते विमान बेपत्ता होण्याशी संबंधित आहे. फ्लाइट क्रमांक ५१३ हे सॅंटियागो एअरलाइन्सचे प्रवासी विमान होते.

  १९५४ मध्ये या सॅंटियागो एअरलाइन्सच्या विमानाने पश्चिम जर्मनीतील आचेन विमानतळावरून उड्डाण केले, परंतु तोपर्यंत ही घटना इतिहासात नोंदवली जाईल हे कोणालाही माहीत नव्हते. होय, ४ सप्टेंबर १९५४ रोजी हे विमान ९२ प्रवाशांसह बेपत्ता झाले होते. फ्लाइट क्रमांक ५१३ टेकऑफनंतर १८ तासांनी ब्राझीलमधील पोर्टो अलेग्रे विमानतळावर उतरणार होते, पण तसे झाले नाही. विमान टेक ऑफ करताच आकाशात गायब झाले. एअर ट्रॅफिक कंट्रोलरने लाखो प्रयत्न करूनही विमानाशी संपर्क होऊ शकला नाही. आणि एअरलाइ कंपनी हे विमान शोधण्यात पूर्णपणे असमर्थ ठरले. ९२ प्रवाशांना घेऊन गेलेले विमान बेपत्ता झाल्याची बातमी जगभर पसरली होती, या बातमीने खळबळ उडाली होती. जगातील अनेक नामांकित गुप्तचर यंत्रणा या विमानाचा शोध घेण्यात व्यस्त होत्या. पण विमान शोधण्यात अपयश आले. हे विमान आकाशात कोसळले असावे किंवा अटलांटिक महासागरात पडले असावे, असा लोकांचा अंदाज होता.

  या अपघातात विमानातील सर्व ९२ प्रवाशांचा मृत्यू झाला असावा अंदाज काढण्यात आला. मात्र विमानाचे अवशेष कुठेच सापडले नाहीत. विमानाचा शोध घेण्यासाठी शोध पथकांनी रात्रंदिवस काम केले. पण त्याचा काही सुगावा लागला नाही. विमान अटलांटिक महासागरावरून उड्डाण करत असताना विमानाशी संपर्क तुटल्याचे सांगण्यात आले.

  विमान बेपत्ता झाल्यानंतर ३७ वर्षांनी एक चमत्कार घडला, पोर्टो अलेग्रे विमानतळावरील नियंत्रण प्रणालीवर कर्तव्यावर असलेल्या नियंत्रकांना अचानक एक मोठे विमान त्यांच्या रडारच्या हद्दीत येताना दिसले, जे विमानतळावर परवानगीशिवाय उतरणार होते. होते. हा सर्व प्रकार पाहून विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

  अधिकाऱ्यांनी व्हॉईस रेडिओद्वारे मेसेज करून धावपट्टी त्वरीत रिकामी केली. जिथे हे विमान उतरणार होते. काही वेळातच विमान धावपट्टीवर सुखरूप उतरले. अधिकाऱ्यांनी विमान पाहिले तेव्हा त्यावर सॅंटियागो एअरलाइन्सचे नाव आणि नंबर होता. हे विमान खूप जुने दिसत होते आणि जणू ते दुसऱ्या जगातून आले होते असे वाटत होते. हे पाहून विमानतळ अधिकारी घाबरले. नंतर संभाषणात वैमानिकाने सांगितले की खराब हवामानामुळे विमान चुकीच्या दिशेने गेले होते.

  लँडिंगनंतर काही वेळातच कुणाला काही समजण्यापूर्वीच विमान पुन्हा टेक ऑफ करताना आकाशात कुठेतरी गायब झाले. त्यानंतर पुन्हा विमान सापडले नाही. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी अजूनही विविध प्रयत्न सुरू आहेत. १९८९ मध्ये वर्ल्ड टॅब्लॉइड मॅगझिनने पहिल्यांदा या विमानाबद्दल प्रसिद्ध केले होते. कारण काहीही असो, ही घटना आजही लोकांसाठी एक गूढ कोडेच आहे. या घटनेनंतर टाइम ट्रॅव्हलच्या चर्चांना जोर आला होता.