गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याचे असे करा निरीक्षण, रक्ततपासणी किती आवश्यक जाणून घ्या

मॅटर्नल सीरमस्क्रीनिंग आणि नॉन-इनवेसिव्हप्रीनॅटल टेस्ट (एनआयपिटी) या रक्त चाचण्या आहेत. ज्या डाउन सिंड्रोम आणि इतर क्रोमोसोमल असामन्यताया सारख्या क्रोमोसोमल विषयक असामान्यता तपासतात.

  गर्भधारणे दरम्यान, गर्भधारणेच्या संपूर्ण कालावधीत आई आणिगर्भ दोघेही निरोगी राहतील याची खात्री करून मातेच्याआरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी रक्त चाचण्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या चाचण्या आईच्या आरोग्याच्या विविध पैलूंबद्दल महत्वाची माहिती देतात, ज्यामुळेडॉक्टरांना कोणत्याही संभाव्य अडचणी त्वरित लक्षात येऊन त्यांचे निराकरण करणे शक्य होते.

  गर्भधारणे दरम्यान मातेच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी रक्त चाचण्या कशा असाव्यात याबाबत न्यूबर्ग सेंटर फॉर जीनोमिक मेडिसिन येथील वरीष्ठ – प्रजनन जीनोमिक्स शास्त्रज्ञ डॉ. शिव मुरारका यांचा सल्ला

  गर्भधारणेची पुष्टी करणेआणि निरोगी असल्याची खातर जमा करणे : गर्भधारणाचाचणीआणिकम्प्लीट ब्लड काऊंट(CBC) यासह गर्भधारणेची पुष्टी करण्यासाठी आणि निरोगी असल्याची खातरजमा करण्यासाठीसामान्यतःप्रसूती पूर्व भेटी दरम्यान काही रक्त चाचण्या केल्या जातात. सीबीसी लालरक्तपेशींची संख्या, पांढऱ्या रक्तपेशींची संख्याआणि प्लेटलेट पातळीचे मूल्यांकन करते, ज्यामुळेआईच्या एकूणआरोग्यस्थितीबद्दल प्रारंभिक माहिती मिळते.

  रक्तप्रकार आणि आरएच फॅक्टरचे मूल्यांकन:

  आई चारक्त प्रकार (ए, बी, एबी, किंवा ओ) आणिआरएच स्थिती (पॉझिटिव्ह किंवानिगेटिव्ह) कोणता हे नक्की करण्यासाठी ब्लड टायपिंग आणिआरएचफॅक्टर चाचणी केली जाते. आई आणि गर्भ यांच्यातील संभाव्य रक्त सुसंगतता समस्याओळखण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे, विशेषत:आरएच विसंगती असल्यास नवजात बाळाला हेमोलाइटिक रोग होऊ शकतो.

  संसर्ग जन्य रोगांसाठी स्क्रीनिंग: 

  माता आणिगर्भाच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या संसर्गजन्यरोगांसाठी रक्ततपासणी, जसेकीह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही), सिफिलीस, हिपॅटायटीसबी आणि रुबेला. यासंक्रमणांचे लवकर निदान करून घेतल्यास गर्भाला संसर्ग होण्याचा धोका कमी करण्यासाठी आणिआईच्याआरोग्याचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य उपचार करण्याची संधी मिळते.

  रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणे:

  जेस्टेशनल डायबीटीसमेलिटस(जिडीएम)गर्भधारणे दरम्यान येणारी सामान्य अडचण आहे. ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढहोते.ग्लुकोज परीक्षण आणि ग्लुकोजटॉलरन्स चाचण्यांसह मातेच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे परीक्षण करण्यासाठी आणि जिडीएमचे निदान करण्यासाठी रक्त चाचण्या केल्या जातात. आहार, व्यायाम आणि आवश्यकअसल्यास, आई आणि बाळ दोघांसाठी ही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी इंसुलिनथेरपीद्वारे जिडीएमचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यकआहे.

  लोह पातळी आणि ॲनिमियाच्या जोखमीचे मूल्यांकन: 

  रक्ताचे प्रमाण आणि गर्भाच्या लोहाची मागणीमधील वाढ यामुळे गर्भधारणे दरम्यान लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया प्रचलित आहे.लोहाचे प्रमाण आणिॲनिमिया आहे का हे पाहण्यासाठी रक्त चाचण्यांमध्ये सीरमफेरीटिन, हिमोग्लोबिन आणि हेमॅटोक्रिट पातळी मोजली जाते. ॲनिमिया टाळण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी आणि गर्भाच्या योग्य विकासासाठी लोहपूरक आहार घेण्याचा आणि आहारात बदल करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

  हार्मोन्स पातळी पाहणे गर्भाच्या वाढीस आणि विकासास हातभार लावण्यासाठी संपूर्ण गर्भधारणेदरम्यान हार्मोन्स मध्ये बदल घडत असतात.प्लेसेंटल फंक्शनचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच गर्भधारणेदरम्यानच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी रक्त चाचण्या ह्युमन कोरिओनिकगोनाडोट्रोपिन (एचसीजी), प्रोजेस्टेरॉनआणि इस्ट्रोजेनसह हार्मोन्सची पातळी मोजतात. हार्मोन्स पातळी योग्य नसल्यास एक्टोपिक गर्भधारणा किंवा गर्भपातयासारख्या अडचणी संभवतात.

  अनुवांशिक विकारांसाठी स्क्रीनिंग: 

  मॅटर्नल सीरमस्क्रीनिंग आणि नॉन-इनवेसिव्हप्रीनॅटल टेस्ट (एनआयपिटी) या रक्त चाचण्या आहेत. ज्या डाउन सिंड्रोम आणि इतर क्रोमोसोमल असामन्यताया सारख्या क्रोमोसोमल विषयक असामान्यता तपासतात.

  या चाचण्या आईच्या रक्तातील गर्भाच्या डीएनएचे विश्लेषण करतात, अनुवांशिक विकारांच्या जोखमीबद्दल महत्वपूर्ण माहिती देतात आणि आवश्यक असल्यास पुढील निदान चाचण्यांबाबत मार्गदर्श नकरतात.

  शेवटी, गर्भधारणेदरम्यान मातेच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी,आईच्या एकूण आरोग्याविषयी महत्वपूर्ण माहिती घेण्यासाठी, संभाव्य अडचणी जाणून घेण्यासाठी आणि प्रसूतीपूर्व काळजी घेण्यासाठी रक्त तपासणीही आवश्यक साधने आहेत नियमित प्रसवपूर्व भेटी आणि योग्य रक्त तपासणी प्रोटोकॉल सर्व समावेश देखरेख सुनिश्चित करतात आणि गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यास प्रोत्साहन देतात.