Mother’s Day 2024 | आईसमान सासूसाठी द्या mother’s day ला खास शुभेच्छा, व्हा बेस्ट सून आणि जिंका मन!

बदलत्या काळानुसार या नात्याला एक वेगळे रूप आले आहे. सासू - सुनेचं हे नातं खास राखण्यासाठी दोघींनाही प्रयत्न केला तर ते नातं अधिक खुलत जात.

  प्रत्येकाच्या आयुष्यात आईचे एक वेगळे स्थान असतं. देव प्रत्येकवेळी सगळ्यांजवळ जाऊ शकत नाही म्हणून त्याने सगळ्यांना देवाच्या रूपात आई दिली आहे.आई म्हणजे जखमांवरचं औषध, मैत्रीण, अंगणातली तुळस, देवीचं रुप, यातना, सहनशीलता,समर्पण,आणि बरेच काही. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मातृदिन साजरा केला जातो. आईबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे. आईप्रमाणे सासू सुनेचं नातं देखील खूप वेगळं असतं.

  बदलत्या काळानुसार या नात्याला एक वेगळे रूप आले आहे. सासू – सुनेचं हे नातं खास ठेवण्यासाठी दोघीनींही प्रयत्न केला तर ते नातं अधिक खुलत जात. अनेकदा घरामध्ये सुनेकडून अपेक्षा केल्या जातात, पण सासूनेसुद्धा आपल्या सुनेला मुलीसमान दर्जा दिला तर या नात्यामध्ये कधीच दुरावा येणार नाही. अनेक घरांमध्ये सासू आईसमान असते. त्यामुळे यंदाच्या मातृदिनाला सासूला देखील हटके शुभेच्छा देऊन खुश करा. मातृदिनाला ज्याप्रमाणे आईला शुभेच्छा दिल्या जातात तशाच शुभेच्छा सासूला देखील देण्यासाठी ‘हे’ काही खास संदेश.

  सासूला शुभेच्छा देण्यासाठी ‘हे’ काही खास संदेश

  ”लग्नानंतर प्रत्येक मुलीसाठी सासूच असते आई
  माहेरात आई जे बीज रोवते तेच पुढे सासू सासरमध्ये वाढवते”

  ”संसार करण्याची शिकवण मिळते सासूकडून
  सुनेसाठी असते जन्मभराची ही शिकवण”

  ”पहिले पाऊल घरात टाकल्यापासून तुमचा आहे डोक्यावर हात
  सासू म्हणून नाही तर आई म्हणूनच ठेवला मायेचा हात”

  ”माहेरीदेखील आई आणि सासरीदेखील आई
  सून म्हणून कधीच जाणवू दिलं नाही”

  ”सासूशिवाय घर वाटे उदास
  घरातील सर्वांसाठी आहे ती खास”

  ”सासू सुनेत असेलही तक्रार
  नात्यात हेच फुलवतं खूपच जास्त प्रेम”

  ”सासूच्या पदरात मिळतेय निःस्वार्थ प्रेम
  मायेने विसरायला होतेय माहेरचे प्रेम”

  ”Happy Mother’s Day म्हणून सासूची घ्या गळाभेट
  तेव्हाच सुरू होतील सासू – सुनेच्या प्रेमाचे नवे सिलसिले”