Mother’s Day 2024 | पहिल्यांदाच आई होणार? घ्या अशी काळजी

आईच्या सन्मानार्थ जगभरात सगळीकडे मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी आईचे भरभरून कौतुक केले जाते. आई या शब्दामध्ये जितकी माया आहे तेवढीच जबाबदारीसुद्धा आहे.

  आई या शब्दामध्ये खूप प्रेम दडलं आहे. प्रत्येक कठीण प्रसंगी आई आपल्या मुलाना नेहमीच जवळ करत असते. त्यांच्यावर प्रेम करते.त्यामुळे आईच्या सन्मानार्थ जगभरात सगळीकडे मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी आईचे भरभरून कौतुक केले जाते. आई या शब्दामध्ये जितकी माया आहे तेवढीच जबाबदारीसुद्धा आहे. आपल्या मुलांना जन्म देण्यापासून ते त्यांचे पालन पोषण करण्यापासुन सांगल्याच गोष्टी आईला कराव्या लागतात. बाळाला जन्म दिल्यानंतर एक महिला तिच्या नवीन आयुष्याला पुन्हा एकदा सुरुवात करते. ती सकाळीपासून ते रात्रीपर्यंत आपल्या बाळाच्या अवतीभोवती फिरत असते. बाळाला दूध पाजण्यापासून ते आंघोळीपर्यंतच्या सर्व गोष्टींचे वेळापत्रक आईकडे निश्चित झालेले असते. मात्र यामुळे तिच्या आरोग्याकडे तिचे दुर्लक्ष होते. यामुळे काहीवेळेस तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. प्रत्येक महिलेने स्वतःसाठी थोडासा वेळ तरी नक्कीच काढला पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर…

  पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

  स्वतःसाठी वेळ काढावा:

  दिवसाभरामध्ये आईला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आरोग्याकडे तिचे दुर्लक्ष होते. भविष्यातील गंभीर परिणाम टाळण्यासाठी दिवसभरातील एक तास तरी स्वतःसाठी काढणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये कुटुंबासोबत जास्त वेळ घालवून बाळाची काळजी घ्यावी. आई झाल्यानंतर एखादे पुस्तक वाचणे, चित्रपट पाहणे किंवा स्वतःचे छंद जोपासण्याच्या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ यासाठी स्वतःला प्राधान्य देणे कधीच विसरू नये. दिवसभरातील काहीवेळ स्वतःसाठी काढणे गरजेचे आहे.

  पूर्ण झोप घ्यावी:

  निरोगी जीवनशैली जगण्यासाठी दिवसातून कमीत कमी ७ ते ८ तास झोपणे फार गरजेचे आहे. नवजात बाळामुळे आईला पुरेशा प्रमाणात झोप घेणे शक्य होते. बाळासोबत किमान नऊ ते 10 तासांचा वेळ अंथरुणामध्येच घालवण्यावर लक्ष केंद्रीत करावे. जेव्हा तुमचे बाळ झोपेल तेव्हा तुम्हीसुद्धा तुमची झोप पूर्ण करू शकता.

  शरीर हायड्रेट ठेवणे:

  नुकताच जन्म झालेल्या बाळांची काळजी घेण्यासाठी फार संयम आणि शरीरामध्ये ऊर्जा असणे गरजेचे आहे. शरीर हायड्रेट राहील याची जास्त काळजी घ्यावी. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्यावे. पाणी पिल्याने केसांचे आणि त्वचेचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिल्याने शरीराचे वजन नियंत्रणामध्ये राहते.

  बदलांचा स्वीकार करावा:

  बाळाचा जन्म झाल्यानंतर आयुष्यात अनेक नवनवीन बदल होतात. मात्र काहीवेळेस जीवनामध्ये होणाऱ्या या बदलांना घाबरतात. शारीरिक बदलांचा स्वीकार करणे यावेळेस थोडे कठीण होऊन जाते. महिलांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र महिलांना जीवनामध्ये झालेल्या बदलांचा हसतमुखाने स्वीकार करणे गरजेचे आहे. मानसिक तणाव येत असल्याचे तुमच्या पार्टनरशी किंवा मित्र मैत्रिणीसोबत बोलून आपले मन मोकळे करावे.