सुट्टीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ समुद्र किनाऱ्यांना आवर्जून भेट द्या

महाराष्ट्राला सगळ्यात मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. सगळ्यात मोठं राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. किल्ले, लेण्या, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे यांसारख्या अनेक गोष्टी महाराष्ट्रात फिरणाऱ्या सारख्या आहेत.

  महाराष्ट्राला सगळ्यात मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. सगळ्यात मोठं राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. किल्ले, लेण्या, मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे यांसारख्या अनेक गोष्टी महाराष्ट्रात फिरणाऱ्या सारख्या आहेत.महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा पाहण्यासाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक महाराष्ट्रामध्ये येतात. सध्या सगळीकडे उन्हाळा हा ऋतू सुरु झाला आहे. या दिवसांमध्ये मुलांना सुट्ट्या पडतात. त्यामुळे या सुंदर वातावरणात तुम्हाला देखील तुमच्या मुलांना घेऊन बाहेर फिरायला जायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रातील ‘या’ काही खास समुद्र किनाऱ्यांना भेट देऊ शकता. महाराष्ट्रामध्ये असे अनेक समुद्र किनारी आहेत ज्याच्याबद्दल अजूनही कोणाला काहीच माहित नाही. चला तर पाहुयात महाराष्ट्रातील सुंदर सुमुद्र किनारे कोणते आहेत.

  मालवण

  कोकणातील सर्वच समुद्र किनाऱ्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कोकणातील सर्वात लोकप्रिय समुद्र किनारा म्हणून मालवण सुमुद्र किनारा प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक या समुद्र किनाऱ्याला भेट देतात. नितळ आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी मालवण समुद्र प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पांढरी वाळू आणि निळे पाणी हे इथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करते. तसेच कोकणात असलेली काजूची झाड, नारळाची झाड यांनी कोकणच्या सौंदर्यात भर घातली आहे. या समुद्र किनारी तुम्ही वॉटरस्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता.

  आंजर्ले

  सगळ्यात शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा म्हणून आंजर्ले समुद्र किनारा प्रसिद्ध आहे. या समुद्र किनाऱ्याच्या आजूबाजूला असलेली नारळाची, पोफळीची झाडे यामुळे या सौंदर्य वाढले आहे. या कोकणातील बीचवर अनेक जण कुटुंबासोबत शॉर्ट पिकनिकसाठी जातात. सर्वात स्वच्छ समुद्र किनारा असल्याने हा बीच पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. इथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेता येईल.

  तारकर्ली

  तारकर्ली हा सिंधूदुर्ग जिल्ह्यातील पर्यटकांचा सगळ्यात लोकप्रिय समुद्र किनारा आहे. या बीचवर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या दोन्ही ऋतूंमध्ये मोठी गर्दी असते. मालवणपासून ८ किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे. या समुद्राचे खास आकर्षण म्हणजे इथे तुम्हाला स्कूबा डायव्हिंग आणि इतर वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल.