
बहुतेक लोक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना देखील करतात.
नवरात्री २०२३ : हिंदू धर्मामधील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजेच शारदीय नवरात्र. शारदीय नवरात्रीला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. बऱ्याच मंडळांच्या देवींचे आगमन सुद्धा झाले आहे. बरेच जण देवीच्या या महोत्सवासाठी बरीच तयारी करत आहेत. नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते. पहिल्याच दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्याची परंपरा आहे. बहुतेक लोक नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना देखील करतात. असे सांगितले जाते की ज्या घरामध्ये कलश ठेवलेला असतो त्या घरामध्ये माता राणीचा वास असतो. त्या घरामध्ये सदैव सुख-समृद्धी असते. त्यामुळे जर तुम्हीही कलशाची स्थापना करणार असाल तर येथे जाणून घ्या त्यात कोणते पूजा साहित्य वापरले आहे.
कलश स्थापन करण्यासाठी लागणारे साहित्य –
कलश, गंगाजल, अक्षत, नाणे, गहू, आंब्याच्या पानांचा पल्लव (आंब्याची पाने), मातीचे भांडे, शुद्ध माती, मातीवर ठेवण्यासाठी स्वच्छ कापड, पितळ किंवा मातीचा दिवा, तूप, कापसाची वात, लाल कुंकू, लाल कपडे, नारळ.
देवीच्या श्रृंगारासाठी साहित्य –
लाल चुनरी, बांगडी, जोडवी, पैंजण, पुष्पहार, कानातले, नथ, लाल कुंकू, टिकली, मेहंदी, काजळ, लिपस्टिक, अत्तर
शारदीय नवरात्री २०२३ च्या घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त –
घटस्थापना शुभ मुहूर्त – १५ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.४४ पासून
कलश स्थापनेसाठी आणि पूर्ण करण्यासाठी शुभ वेळ – १५ ऑक्टोबर २०२३ दुपारी १२:३० वाजता
नवरात्री २०२३ प्रारंभ तारीख- १५ ऑक्टोबर २०२३
नवरात्री २०२३ पूर्ण होण्याची तारीख- २४ ऑक्टोबर २०२३