
यावर्षी नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होत आहे. या वेळी भक्त नवरात्रीचे व्रत पाळतात आणि अखंड ज्योत प्रज्वलित करतात.
शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri 2023) लवकरच सुरुवात होणार आहे. शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून होते. नवरात्री दरम्यान, भक्त दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि उपवास देखील करतात. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये अखंड ज्योत (Navratri Akhand Jyot) प्रज्वलित केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचेही विशेष महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया अखंड ज्योत लावण्याचे महत्त्व आणि त्याचे नियम.
अखंड ज्योतीचे महत्त्व
नवरात्रीच्या काळात विशेष मनोकामना पूर्ण करण्यासाठी अखंड ज्योत लावली जाते. साधकाने नऊ दिवस सतत दिवा न विझवल्यास त्याला अखंड ज्योत म्हणतात. ही ज्योत सतत तेवत राहिल्यास देवीचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो. ही अखंड ज्योत विझवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे नऊ दिवस अखंड ज्योतीची विशेष काळजी घेतली जाते. जे शारदीय नवरात्रीचे व्रत करतात, ते प्रतिपदा तिथीपासून दशमी तिथीपर्यंत अखंड ज्योत अवश्य प्रज्वलित करतात. असे केल्याने माता दुर्गा आपल्या भक्तावर प्रसन्न होते आणि साधकाला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देते.
अखंड ज्योतचे नियम
ज्योत पेटवताना या मंत्राचा जप करावा. शुभम ‘करोती कल्याणम्, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाश, दीपम् ज्योति नमोस्तुते’
अखंड ज्योती प्रज्वलित करताना लक्षात ठेवा की दिवा जव, तांदूळ किंवा गहू अशा धान्याच्या ढिगाऱ्यावर ठेवावा. ते कधीही थेट जमिनीवर ठेवू नका.
तुपाने पेटवलेली अखंड ज्योती उजव्या बाजूला ठेवावी. त्याचबरोबर अखंड ज्योती डाव्या बाजूला तेलाने पेटवून ठेवणे शुभ मानले जाते.
ज्योतीला घरात एकटे सोडणे शुभ मानले जात नाही. अशा परिस्थितीत घरात अखंड ज्योत लावल्यानंतर घराला एकटे सोडू नका किंवा घराला कुलूप लावू नका.
अखंड ज्योत प्रज्वलित करण्यासाठी वापरलेला दिवा किंवा तुटलेला दिवा वापरू नये. नऊ दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्योत नैसर्गिकरित्या विझू द्यावी.
ज्योत विझण्यापासून कशी वाचवायची
धार्मिक मान्यतांनुसार, जळल्यानंतर ज्योत विझली तर ती अशुभ मानली जाते. अशा वेळी जर तुम्ही मातीच्या दिव्यात अखंड ज्योती पेटवत असाल तर एक दिवस तो दिवा आधी पाण्यात भिजवावा. यानंतर तुम्ही तो वापरू शकता.
मधून मधून तेल किंवा तूप घालत रहा. असे केल्याने ज्योत जास्त काळ जळते. तसेच मोठ्या आकाराचा मातीचा दिवा वापरावा, जेणेकरून त्यात ठेवलेले तूप किंवा तेल जास्त काळ टिकेल. वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही ज्योतवर काचेचा गोल आवरण देखील ठेवू शकता.