रात्रपाळी करणे ठरू शकते घातक, लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका!

तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

  तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये जर नियमितपणे काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने लठ्ठपणा आणि डायबिटीसचा धोका वाढू शकतो. 

  वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी आणि पॅसिफिक नॉर्थवेस्ट नॅशनल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासात असे दिसून आले आहे की काही दिवस काम केल्याने शरीरातील प्रथिनांची पातळी बिघडते, ज्याचा थेट परिणाम रक्तातील साखरेवर आणि शरीराच्या उर्जेवर होतो, ज्यामुळे डायबिटीस वाढून तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

  शोधात काय आढळले?

  night shift job problem

  अभ्यासादरम्यान, संशोधकांनी ज्यांच्यावर हा शोध करण्यात आल्या त्या व्यक्तींना नियंत्रित वातावरणात ठेवले आणि त्यांना काही दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये आणि काही दिवस दिवसाच्या शिफ्टमध्ये काम करण्यास सांगितले. यानंतर त्याच्या रक्तवाहिन्यांचे विश्लेषण करण्यात आले. विश्लेषणात असे आढळून आले की रात्रीच्या शिफ्टमध्ये काम केल्याने शरीरातील विशिष्ट प्रथिनांच्या पातळीवर परिणाम होतो जे रक्तातील साखरेची पातळी आणि ऊर्जा चयापचय नियंत्रित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

  बायोलॉजिकल त्रास 

  या अभ्यासाचे वरीष्ठ लेखक प्रोफेसर हंस व्हॅन डोंगेन यांनी सांगितले की, आपल्या मेंदूतील मुख्य जैविक घड्याळ (मास्टर क्लॉक) दिवस-रात्र चक्र नियंत्रित करते. शरीराच्या इतर भागांनाही स्वतःची अशी अंतर्गत घड्याळे असतात. रात्री काम केल्यामुळे जेव्हा ही अंतर्गत घड्याळे बिघडतात तेव्हा शरीरात सतत तणावाची स्थिती निर्माण होते. या ताणामुळे दीर्घकाळात लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे आजार होऊ शकतात.

  अधिक शोधाची गरज 

  परंतु, रात्रीच्या शिफ्टनंतर हे धोके किती वाढू लागतात आणि हे धोके कमी करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे समजून घेण्यासाठी अधिक संशोधनाची आता आवश्यकता आहे. मात्र रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा अभ्यास नक्कीच धोक्याचा इशारा आहे. 

  तुम्हीही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. झोपेची वेळ शक्य तितकी नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आहाराकडेदेखील लक्ष द्या. तसेच डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेत राहा, अन्यथा डायबिटीस आणि लठ्ठपणा हा तुमचा जीव घेऊ शकतो हे लक्षात ठेवा.