WhatsApp (2)

जगभरात सोशल मीडियाचा (Social Media) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरसह व्हॉट्सऍप युजर्सची संख्या जास्त आहे. असे असताना सोशल मीडियापैकी एक असलेल्या व्हॉट्सऍप (WhatsApp) कंपनीकडून आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो.

    जगभरात सोशल मीडियाचा व्हॉट्सॲपचा (WhatsApp) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लवकरात लवकर मेसेज, व्हिडिओ पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सॲपचा वापर केला जातो. त्यामुळे व्हॉट्सऍपचाही नेहमी आपल्या युजर्संना विशेष काहीतरी देण्यावर भर असतो. त्यात आता व्हॉट्सऍपकडून नवं फीचर आणलं जात आहे. ज्याच नाव आहे रिसेंट हिस्ट्री शेअरिंग’ म्हणजे आता जर तुम्ही एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड झालात तर तुम्हाला ग्रुपमधील जुनी चॅट वाचता येणार. व्हॉट्सअ‍ॅप या नवीन फीचरवर काम करत आहे.

    आपण एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड झाल्यानंतर त्या ग्रुपमधील सदस्य कुठल्याही विषयावर चर्चा करत असणार तर तर आपल्याला कळत नाही. ही समस्या दूर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरनुसार, आता नवीन सदल्याला जुने चॅट वाचता येणार आहे. मात्र, त्यांना जुनी चॅट वाचू द्यायची की नाही याचा अधिकार मात्र, ग्रुप अ‍ॅडमिन्सना असणार.

    नवीन सदस्याला मागील २४ तासांच्या चॅट्स पाहता येतील

    व्हॉट्सॲपनेच्या अपडेट नुसार, जर ग्रुप अ‍ॅडमिनने हे फीचर चालू केले तर ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांना त्याची माहिती मिळेल आणि नवीन सदस्य जॉईन होताच त्यांना मागील २४ तासांच्या चॅट्स पाहता येतील. या अपडेटची माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या विकासावर नजर ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे.

    मल्टी अकाउंट लॉगिन फीचर ही येणार

    अनेक जणांना कामाच्या चॅट आणि वैयक्तिक चॅट एकावेळी करताना कसरत करावी लागते. अनेक जण कामाच्या चॅट आणि वैयक्तिक चॅट करण्यासाठी दोन वेगळ्या फोन नंबरवर व्हॉट्सॲप वापरतात. मात्र, एकावेळी दोन नंबरने व्हॉट्सॲप वापरणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे आता व्हॉट्सअ‍ॅपने काही काळापूर्वी अँड्रॉईड बीटा यूजर्सला मल्टी अकाउंट लॉगिन नावाचे फीचर दिले आहे, ज्याच्या मदतीने यूजर्स एकाच फोनमध्ये अनेक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट उघडू शकतात. या फीचरमुळे युझर त्यांच्या कामाच्या चॅट आणि वैयक्तिक खाती एकाच फोनवर ऑपरेट करू शकतील. एकदा तुम्ही नवीन खाते जोडल्यानंतर, पुढच्या वेळी ते उघडण्यासाठी तुम्हाला फक्त २ खात्यांमध्ये स्विच करावे लागेल. म्हणजेच, पुन्हा पुन्हा लॉग इन करण्याची आवश्यकता नाही.