
संशोधनात असे आढळून आले की, आठवड्यात 11 ग्लास वाइन प्यायलेल्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी असल्याचे दिसून आले. या लोकांना मद्यपान न करणाऱ्या आणि जास्त मद्यपान करणाऱ्यांपेक्षा करणाऱ्याला हृदयरोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी...
अलीकडेच वाइन ही हृदयासाठी चांगली आहे, हे सिद्ध झाले आहे. संशोधनात वैज्ञानिकांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, वाइन पिणे हृदयरोगापासून संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरते. आता झालेल्या ताज्या संशोधनानुसार ‘अल्कोहोल फ्री वाइन’ पिणे देखील हृदयासाठी तितकचं फायदेशीर आहे जितकं अल्कोहोलयुक्त रेड वाइन पिणं.
शास्त्रज्ञांच्या मते, अल्कोहोल फ्री वाइन देखील अल्कोहोलयुक्त वाइन सारखेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अँग्लिया रस्किन विद्यापीठाने केलेल्या संशोधनात हे सांगितले गेले आहे. संशोधन केल्या व्यक्तींच्या शरीरावर मर्यादित प्रमाणात अल्कोहोल घेण्याचे परिणाम दिसून येत होते. Advertisement संशोधनात 40 ते 69 वयोगटातील 4 लाख 50 हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता.
संशोधनात असे आढळून आले की, आठवड्यात 11 ग्लास वाइन प्यायलेल्या लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी असल्याचे दिसून आले. या लोकांना मद्यपान न करणाऱ्या आणि जास्त मद्यपान करणाऱ्यांपेक्षा करणाऱ्याला हृदयरोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी असल्याचा आढळून आला.
तसाच परिणाम त्या लोकांमध्ये देखील दिसून आला जे दररोज नॉन-अल्कोहोल वाइनचे सेवन करत होते. याचे कारण असे की, वाइनचे गुण अल्कोहोलमधून न येता द्राक्षांमधून येत होते. द्राक्षांमध्ये आढळणारे उच्च अँटी-ऑक्सिडंट्स किंवा पॉलीफेनॉलमुळे हृदयाचे आतील आवरण चांगले कार्य करू लागते.
किती प्रमाणात करावे वाईनचे सेवन ?
संशोधनात असे आढळून आले की, जे लोक आठवड्यातून 8-11 ग्लास रेड वाइन पितात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो. अल्कोहोल फ्री वाइन प्यायलेल्या लोकांसोबतही असेच घडल्याचे दिसून आले. Advertisement मुख्य रिसर्चर डॉक्टर रुडोल्फ (Dr Rudolph schutte) यांनी सांगितलं की, द्राक्षांपासून बनलेले अल्कोहोल आणि हृदयाचे चांगले संबंध नाकारता येत नाहीत.
अल्कोहोल-फ्री वाइनच्या बाबतीतही असेच आहे, कारण दोन्ही वाइनमध्ये पॉलीफेनॉल आढळतात. परंतु, संशोधकांनी असेही म्हटले आहे की, जे लोक बिअर, सायडर आणि स्पिरिट सारख्या गोष्टी पितात त्यांना कर्करोगाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.