'ती'चा सवती मत्सर : Thailand King च्या गर्लफ्रेंडचा Nude Photo झाला लीक; पुढे झालं असं की...
(फोटो साभार : डेली मेल)
'ती'चा सवती मत्सर : Thailand King च्या गर्लफ्रेंडचा Nude Photo झाला लीक; पुढे झालं असं की... (फोटो साभार : डेली मेल)

थायलंडचे (Thailand) राजा महा वजिरालोंगकोर्न (Maha Vajiralongkorn) यांच्या गर्लफ्रेंडचे शेकड्याहून अधिक न्यूड फोटोज लीक झाले आहेत. या कारस्थानात थायलंडच्या राणीचा हाथ असल्याचं बोललं जातंय.

नवी दिल्ली : थायलंड (Thailand) चा राजा आणि त्याची गर्लफ्रेंड आणि त्याच्या पत्नीच्या वादातून खळबळ उडाली आहे. थायलंडचे राजा महा वजिरालोंगकोर्न (Maha Vajiralongkorn) यांची गर्लफ्रेंड सीनीत वोंगवजिरापकडीचे जवळपास एक हजार फोटोज लीक झाले आहेत. यात अधिकाधिक फोटो न्यूड आहेत. फोटो लीक होण्यामागे राजाची पत्नी सुथिडा आणि गर्लफ्रेंड सीनीत यांच्यात वाद आहेत. हे फोटो नियोजनपूर्वक लीक करण्यात आले आहेत.

अलीकडेच झालीये तुरुंगातून सुटका

गेल्याच वर्षी थायलंडच्या राजाच्या गर्लफ्रेंडला तुरुंगात डांबण्यात आलं होतं. राजाची गर्लफ्रेंड सीनीत अलीकडेच तुरुंगातून सुटून आली आहे आणि तिने पुन्हा राजाशी जवळीक साधली आहे. या दरम्यान त्यांचे शेकड्याहून अधिक फोटो लीक करण्यात आले आहेत.

स्वत: सीनीतनेच काढले आहेत फोटो

डेली मेलच्या एका अहवालानुसार, हे फोटोज २०१२ ते २०१४ या दरम्यान काढले आहेत. स्वत: सीनीतनेच हे फोटो काढले असल्याचं सांगण्यात येतंय.

राजाने केलीयेत चार लग्न

थायलंडच्या राजाची चार लग्नं झाली आहेत. ६८ वर्षांच्या राजा वजिरालोंगकोर्नने २०१९ मध्ये चौथे लग्न सुथिडा यांच्याशी केलं आहे. तीन राण्यांपासून त्यांना सात मुले आहेत. आता आधीच्या तिन्ही पत्नींसोबत त्यांनी काडीमोड (Divorce) घेतला आहे.

राणी आणि गर्लफ्रेंड दोघीही होत्या राजमहालात कामाला

४२ वर्षांची राणी सुथिडा आणि ३५ वर्षांची गर्लफ्रेंड सीनीत, दोन्ही राजाच्या महालात वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत होत्या. सुथिडाने या आधी थाई एअरवेजमध्ये फ्लाइट क्रू म्हणूनही काम केलं आहे, तर सीनीत आर्मी नर्स होती.

या आरोपासाठी भोगलाय तुरुंगवास

(फोटो साभार : डेली मेल)

राजाच्या गर्लफ्रेंडला २०१९ साली तुरुंगवासात जावं लागलं. तिच्यावर राणी सुथिडाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.