मेथी कढीपत्यापासून बनवलेल्या तेलाने केस गळतीची समस्या होईल दूर

केस गळतीची समस्या वाढल्यानंतर आपण बाहेर मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरण्यास सुरुवात करतो. मात्र त्याचा फायदा जास्त काळ केसांना होत नाही.

    बदलत्या जीवनशैलीचा परिणाम महिला आणि पुरुषांच्या आरोग्यावर दिसून येतो. काहींना तर प्रत्येक ऋतूनुसार समस्या जाणवत असतात.तसेच बदलत्या हवामानाचा परिणाम त्वचेवरच नाही तर केसांवरसुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यात त्वचेसोबतच केसांची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. अनेकदा केसांची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे केस गळणे, कोंडा, केस विचारल्यानंतर केस तुटणे यांसारख्या अनेक समस्या जाणवू लागतात.

    केस गळतीची समस्या वाढल्यानंतर आपण बाहेर मिळणारे महागडे प्रॉडक्ट वापरण्यास सुरुवात करतो. मात्र त्याचा फायदा जास्त काळ केसांना होत नाही. केस गळतीचा त्रास वाढत चालल्याने काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे सतत होणारी केस गळती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. वर्षानुवर्षे सुरु असलेली केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी मेथी दाणे आणि कढीपत्ता वापरला जातो. शिवाय कांदा आणि खोबऱ्याचे तेल वापरून अनेक समस्यांवर आराम मिळवता येतो.कढीपत्ता मेथी दाणे वापरून बनवलेले तेल नियमित वापरल्याने केसांसंबंधित अनेक समस्या दूर होतात. केस लांब, घट्ट आणि मजबूत होण्यास मदत होईल.

    मेथी कढीपत्ता वापरून हेअर ऑइल असे बनवा:

    • हेअर ऑइल बनवण्यासाठी कांद्याचे तुकडे करून घ्या. त्यानंतर कढीपत्ता घेऊन तोही स्वच्छ धुवून घ्या.
    •  एका पॅनमध्ये १ वाटी खोबऱ्याचे तेल घेऊन ते गरम करण्यासाठी ठेवा.
    • तेल गरम झाल्यानंतर त्यात 10 ते 15 धुतलेली आणि वाळलेली कढीपत्ता, चिरलेला कांदा, 2 ते 3 हिबिस्कसची फुले घाला. नंतर मिश्रणामध्ये १ चमचा मेथी दाणे घालून किमान दोन मिनिटे शिजवा.
    • कांदा आणि कढीपत्ता रंग बदलेपर्यंत पूर्णपणे शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा.
    • तेल थंड झाल्यावर तेल गाळून, काचेच्या बाटलीत साठवा आणि केसांना लावा.
      केसांना तेल लावल्यानंतर ते ३० मिनिटांपर्यंत ठेवून नंतर धुवून टाका.