On what dates will Sankashti Chaturthi come in the year 2021?

संकष्ट चतुर्थीला उपवास करणाऱ्या प्रत्येकाचे संकट गणपती बाप्पा आपल्याकडे घेतो. तसेच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीच्या तिथीनुसार साजरी केली जाते. पुर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे १३ व्रत केले जातात. तर जाणून घ्या २०२१ मधील संकष्टी चतुर्थीच्या तारखांची यादी.

मुंबई : अनेका जाणांना नवीन वर्षात कोणता सण कोणत्या तारखेला आहे. जाणून घेण्याची सवय असते. तर आपण जाणून घेणार आहोत की, २०२१ वर्षात संकष्टी चतुर्थी कोणत्या तारखांना येणार आहे. संकष्टी चतुर्थी हा सण गणपतीला समर्पित केला आहे. त्यामुळे या दिवशी सर्वच जण गणपतीची पूजा करतात.

गणपतीला प्रथम देव मानलं आहे. म्हणूनच आपण प्रत्येक शुभकार्यापूर्वी गणपतीची पूजा करत असतो. चतुर्थी तिथी गणपतीची मानली जाते. त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला गणपतीच्या नावनं उपवास केला जातो. संकष्ट चतुर्थी म्हणजे दुःखाचा पराभव करणारा असा होतो. हिंदू पंचांगानूसार संकष्टी चतुर्थीचा व्रत कृष्ण पक्ष चतुर्थीला ठेवला जातो.

संकष्ट चतुर्थीला उपवास करणाऱ्या प्रत्येकाचे संकट गणपती बाप्पा आपल्याकडे घेतो. तसेच संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष चतुर्थीच्या तिथीनुसार साजरी केली जाते. पुर्ण वर्षात संकष्टी चतुर्थीचे १३ व्रत केले जातात. तर जाणून घ्या २०२१ मधील संकष्टी चतुर्थीच्या तारखांची यादी.

शनिवार, ०२ जानेवारी संकष्टी चतुर्थी
रविवार, ३१ जानेवारी संकष्टी चतुर्थी
मंगळवार, ०२ मार्च अंगारकी चतुर्थी
बुधवार, ३१ मार्च संकष्टी चतुर्थी
शुक्रवार, ३० एप्रिल संकष्टी चतुर्थी
शनिवार, २९ मे संकष्टी चतुर्थी
रविवार, २७ जून संकष्टी चतुर्थी
मंगळवार, २७ जुलै अंगारकी चतुर्थी
बुधवार, २५ ऑगस्ट संकष्टी चतुर्थी
शुक्रवार, २४ सप्टेंबर संकष्टी चतुर्थी
रविवार, २४ ऑक्टोबर संकष्टी चतुर्थी
मंगळवार, २३ नोव्हेंबर अंगारकी चतुर्थी
बुधवार, २२ डिसेंबर संकष्टी चतुर्थी