Ostrich eggs have to wait 50 minutes to an hour and a half to boil

एका संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता या अंड्यात होऊ शकतो हे खरेच आहे पण त्यासाठी अंडे शिजेपर्यंत धीर धरण्याची तयारी मात्र हवी. कोंबडीचे अंडे उकडायला फारतर 10 मिनिटे लागतात पण शहामृगाचे अंडे उकडण्यासाठी 50 मिनिटे ते दीड तास प्रतीक्षा करावी लागते. अंड्याचे टरफल मऊ असेल तर 50 मिनिटे, कडक असेल तर दीड तास. हे अंडे दिसायला कोंबडीच्या अंड्यासारखेच आहे फक्त त्याचा आकार प्रचंड म्हणजे साधारण कोंबडीच्या 24 अंड्याइतका असतो.

    अंडे का फंडा, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे अश्या अनेक जाहिराती आपण नित्य पाहतो. अनेक कुटुंबात सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडे समाविष्ट असते. पण बहुतेकवेळा त्यासाठी कोंबडीची अंडी वापरली जातात. एकदा तगडा अंडे प्रेमी एकावेळी दोन चार अंडी सहज फस्त करू शकतो. पण असेही एक अंडे आहे ज्यात संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता होऊ शकतो. जगातील सर्वात मोठा पक्षी शहमृग याच्या अंड्याविषयी आपण बोलत आहोत.

    एका संपूर्ण कुटुंबाचा नाश्ता या अंड्यात होऊ शकतो हे खरेच आहे पण त्यासाठी अंडे शिजेपर्यंत धीर धरण्याची तयारी मात्र हवी. कोंबडीचे अंडे उकडायला फारतर 10 मिनिटे लागतात पण शहामृगाचे अंडे उकडण्यासाठी 50 मिनिटे ते दीड तास प्रतीक्षा करावी लागते. अंड्याचे टरफल मऊ असेल तर 50 मिनिटे, कडक असेल तर दीड तास. हे अंडे दिसायला कोंबडीच्या अंड्यासारखेच आहे फक्त त्याचा आकार प्रचंड म्हणजे साधारण कोंबडीच्या 24 अंड्याइतका असतो.

    हे अंडे अतिशय स्वादिष्ट आणि पोषक आहे. त्याचे वजन 1 ते 1.3 किलो इतके असते. प्रत्येक अंड्यातून 2 हजार कॅलरी मिळतात. शहामृग हा असा एकमेव पक्षी आहे त्याची लांबी 9 फुटापर्यंत असू शकते आणि वजन क्विंटल मध्ये असते. त्यामुळे त्याची अंडी सुद्धा हेल्दी असतात. त्यात सॅच्युरेटेड फॅटस आणि कोलेस्टेरॉल कोंबडीच्या अंड्यापेक्षा सुद्धा कमी असते. हे अंडे 6 ते 15 सेंटीमीटर व्यासाचे असते. अंडी नर सुद्धा उबवतो. अंडे उबवून पिलू बाहेर यायला 42 ते 46 दिवस लागतात. शहमृगाचे आयुष्य 50 ते 70 वर्षाचे असते.