धक्कादायक! का बदलतोय पुरुषांच्या लिंगाचा आकार, नपुसंकता-वांझोटेपणाची टांगती तलवार; या सेलिब्रिटी महिलांनी व्यक्त केलीये ‘ही’ चिंता

२०१९ साली प्रदूषणामुळे भारतात १७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. विश्वात कोरोना व्हायरसमुळे ४२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रदूषण जर अशाच प्रकारे वाढत राहिलं तर येत्या काळात माणसांना आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यात अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळू शकतात.

  नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोना व्हायरस (Coronavirus Pandemic) महामारीने हाहाकार माजविला असून दुसरीकडे प्रदूषणही लोकांसाठी आता चिंतेचा विषय ठरतो आहे. एका संशोधनात अतिशय धक्कादायक आणि चकीत करणारा खुलासा समोर आला आहे. यानुसार प्रदूषणामुळेच (Pollution) पुरुषांच्या लिंगाचा आकार छोटा होतो आहे. हा खुलासा न्यूयॉर्क स्थित माऊंट सिनाई रुग्णालयाच्या संशोधनात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार पुरुषांच्या लिंगाचा आकारा दिवसेंदिवस लहान होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

  येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल की, २०१९ साली प्रदूषणामुळे भारतात १७ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. विश्वात कोरोना व्हायरसमुळे ४२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रदूषण जर अशाच प्रकारे वाढत राहिलं तर येत्या काळात माणसांना आणखी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यात अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळू शकतात.

  तर या खुलाशाबाबत महिला सेलिब्रिटींनीही आपले मत नोंदविले आहे. पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग म्हणाली, आपण सर्व पुढील हवामान संपात भेटूया.

  ग्रेटा थनबर्गचे ट्विट

  या संशोधनावर सातत्याने चर्चा होत असून बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानेही प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणते की, आता कदाचित हवामान संकट आणि प्रदूषणाला आपण गांभीर्याने घ्यायला हवं.

  दिया मिर्झाचे ट्विट

   

  डॉ. स्वान यांनी हे संपूर्ण प्रकरण म्हणजे माणसांच्या अस्तित्वावर एक संकटच असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात की, या संशोधनात एका अशा रसायनाबाबत संशोधन झालं आहे जी पुरुषांच्या प्रजनन क्षमता कमी करण्याचे काम करते. यामुळेच पुरुषांच्या लिंगाचा आकार लहान होतोय आणि ते आकुंचन पावत आहेत.