
भारतातील बहुतेक लोक दिवसातून तीन वेळा खातात. यामध्ये न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. जेवल्यानंतर किमान चार तासांनीच अन्न खावे.
परफेक्ट खाण्याची वेळ : रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला कधी कधी जेवण सुद्धा वेळेवर करायला वेळ नसतो. असे बऱ्याच वेळा होते की आपण जेवण संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी करतो किंवा रात्रीचे जेवण मध्यरात्री करतो. जर तुम्ही योग्य वेळी अन्न खाल्ले नाही तरी ते तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते. हे १०० टक्के खरे आहे. हेल्दी अन्न हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते जेव्हा ते योग्य वेळी खाल्ले जाते. आरोग्यदायी अन्न चुकीच्या वेळी खाल्ल्यास दुष्परिणाम दिसू शकतात. तज्ज्ञांच्या मते, अन्न खाण्याची योग्य वेळ आणि प्रत्येक जेवणातील अंतर हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. जर तुम्हालाही खाण्याच्या योग्य वेळेबद्दल माहिती नसेल, तर येथे जाणून घ्या खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे.
भारतातील बहुतेक लोक दिवसातून तीन वेळा खातात. यामध्ये न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण समाविष्ट आहे. जेवल्यानंतर किमान चार तासांनीच अन्न खावे. कारण अन्न पचायला खूप वेळ लागतो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण यामध्ये किमान १२ तासांचे अंतर असावे. प्रत्येकाची सकाळी उठण्याची वेळ वेगवेगळी असल्याने अन्न खाण्याचे नियमही बदलतात. सकाळी उठल्यानंतर किमान तीन तासांच्या आत नाश्ता केला पाहिजे. सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी सर्वात महत्वाचा मानला जातो. सकाळी ७ ते ९ ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते. बरेच लोक सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण करतात. त्यामुळे गॅस्ट्र्रिटिस, ऍसिडिटी आणि ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात.
योग्य वेळी नाश्ता केल्यानंतर दुपारचे जेवण १२.३० ते २ या वेळेत घ्यावे. ही अशी वेळ आहे जेव्हा चयापचय वेगाने कार्य करते. यावेळी खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होते. जर तुम्ही व्यस्त असाल, तर तुम्ही ३ वाजेपर्यंत दुपारचे जेवण करू शकता, परंतु त्यापलीकडे कोणताही विलंब समस्या निर्माण करू शकतो. यापेक्षा जर तुम्ही दुपारचे जेवण उशिरा खाल्ले तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते आणि पोटाचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे अन्नाचे पचनही व्यवस्थित होत नाही. त्यामुळे दुपारचे जेवण योग्य वेळीच घेतले पाहिजे. रात्री झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी अन्न खावे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही रात्री २ वाजता झोपलात तर रात्रीचे जेवण ११ वाजता करावे. काही कारणास्तव तुम्हाला झोपायला उशीर झाला तरी जेवण संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान खावे. हा सर्वोत्तम काळ मानला जातो. रात्री उशिरा खाल्ल्याने पचन बिघडू शकते. याशिवाय जेवण उशिरा केल्याने स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. यामुळे झोप कमी होते आणि पोटाची चरबीही वाढते. रात्री उशिरा स्नॅक्स खाणे देखील टाळावे.