phone addiction

 डूमस्क्रोलिंगच्या (Doomscrolling) सवयीमुळे मानसिक आरोग्य (Mental Health) बिघडते. ताण, नैराश्य, अस्वस्थतेतही भर पडते. जर वेळीच ही सवय सुधारली नाही तर मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच शारिरीक आजारही वाढतात.

    जर तुम्ही फोनवर (Spending Time On Phone) खूप वेळ स्क्रोल करण्यात घालवत असाल, कामांना उशीर करत असाल, आपली झोप बाजूला ठेवून, थेट संवाद, सामाजिक वावर बाजूला ठेवून ‘स्क्रोल’ करत असाल, तर तुम्हाला ‘डूमस्क्रोलिंग’(Doomscrolling) म्हणजेच विनाकारण फोन पाहत राहण्याची सवय लागली आहे.

    डूमस्क्रोलिंगच्या सवयीमुळे मानसिक आरोग्य बिघडते. ताण, नैराश्य, अस्वस्थतेतही भर पडते. जर वेळीच ही सवय सुधारली नाही तर मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तसेच शारिरीक आजारही वाढतात.

    सतत मोबाईलमध्ये बघत बसल्याने ‘सव्‍‌र्हायकल स्पाँडिलिसिस’सारखे मानेचे विकार होतात. ‘सर्फिंग’ करताना एका जागी खूप वेळ एकाच स्थितीत बसल्याने मणक्यांचे विकार किंवा संधिवात होण्याचा धोका वाढतो. तसेच हाताचा पंजा व हात बधीर करणारा ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’, स्थूलत्व, दृष्टीविकार असे विविध विकार या सवयीने मागे लागण्याचा धोका असतो. दोन वर्षांत असे विकार वाढले असल्याचे समोर आले आहे.

    रेडिओलहरींच्या सतत संपर्कात राहिल्याने मेंदूत गाठ होण्याचा धोका तज्ञ व्यक्त करतात. ‘यूट्यूब व्हिडीओ’, ‘रील्स’च्या चित्रफिती, स्टोरी, न्यूज, सेलिब्रिटी चित्रफिती आदींच्या जाळ्यात तुम्ही अडकला आहात, याची तुम्हाला जाणीव होणे गरजेचे आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचा दीर्घकालीन मानसिक आणि मेंदूच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.

    ही सवय सोडवण्यासाठी आपला फोन पाहण्याची विशिष्ट वेळ ठरवा. रोज व्यायामानंतर, कामादरम्यान घेतलेल्या ‘ब्रेक्र’मध्ये किंवा तुमच्या सोयीची एखादी वेळ निवडा. त्या वेळेव्यतिरिक्त तुमचा फोन पाहण्याचा मोह टाळा. सकाळी उठल्यानंतरचा वेळ ध्यानधारणा, प्रार्थना, व्यायामासाठी वेळ द्या. रात्रीपासून सकाळपर्यंत फोनपासून लांब राहणे चांगले आहे. आपल्या फोनपासून ‘डिसकनेक्ट’ होऊन निसर्गाशी ‘कनेक्ट’ व्हा, त्यामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल, असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात.