औषध पाकीटरुपात छापली लग्नपत्रिका; डॉक्टर नवरा-नवरीची कमाल सोशल मिडियावर व्हायरल 

    लग्न ठरल्यानंतर सुरू होणारी लगबग जेवढी आनंददायी असते तेवढाच हा सोहळा सगळ्यांपेक्षा वेगळा, हटके कसा होईल यासाठी विषेश खबरगारी घेतली जाते. यात कपडे कसे हवेत, नवरा-नवरीच्या कपड्यांचे काँबिनेशन, स्टेजवरचे थीम डेकोरोशन, जेवण, दागिने या सगळ्याचेच जोरदार प्लॅनिंग केले जाते. त्यात क्रिएटिव्हिटीचा कसही लावला जातो. अशीच क्रिएटिव्हिटी लग्न पत्रिका बनवतानाही अनेक जण लावतात असं आपल्याला पहायला मिळतात. पण इथे तर नवरा-नवरीने कमालच केली.
    नवरदेव आणि नवरीचे प्रोफेशन लक्षात घेऊन त्याला निमंत्रण पत्रिकेत समाविष्ट करण्याचा प्रयोग नेहमीच अनोखी कशी करता येईल याकडे पाहिल जात. अशीच क्रिएटिव्हिटी तमिळनाडू च्या तिरूवन्नमलाई जिल्ह्यातल्या वैद्याकीय व्यवसायातील जोडप्याने दाखवली आहे. एझहिलारसान (Ezhilarasan) आणि वसंथकुमारी (Vasanthakumari) या नवरा-नवरीने औषधाच्या गोळ्यांच्या कव्हरची लग्नपत्रिका बनवली आहे.

    नवरदेव एझहिलारसान हा तिरूवन्नमलाई जिल्ह्यातला आहे. तो व्यवसायाने फार्मसिस्ट असून नवरी वसंथकुमारी ही नर्स आहे. ती विल्लूपूरम जिल्ह्यातल्या गेंजी इथली आहे. आपली लग्न पत्रिका हटके आणि कायम लक्षात राहावी म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यात त्यांची नावे बोल्ड असून सर्व माहिताचा टाईप, फॉरमॅट हे औषधाच्या गोळ्यांच्या कव्हर सारखे आहे.