सर्व पुरुषांनी करावीत ‘ही’ योगासने, कमी होऊ शकतो प्रोस्टेट कर्करोगाचा धोका; वाचा सविस्तर

Prostate Cancer Prevention Tips: प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्याची लक्षणे साधारणपणे ४० वर्षानंतर दिसून येतात. वैद्यकीयदृष्ट्या, प्रोस्टेट कर्करोगावर अनेक उपचार आहेत, परंतु प्रोस्टेट कर्करोग वाढण्यापासून रोखण्यासाठी काही योगासने प्रभावी असल्याचे मानले जाते.

  केवळ पुरुष प्रजनन प्रणालीमध्ये प्रोस्टेट ग्रंथी (Prostate Gland) असते. ही एक लहान ग्रंथी आहे, जी पुरुषाचे जननेंद्रिय आणि मूत्राशय यांच्यामध्ये मूत्रमार्गाच्या जवळ असते. त्याचे कार्य वीर्य उत्पादनात मदत करणे आहे. अनेक वेळा प्रोस्टेट ग्रंथीमध्ये विविध कारणांमुळे कर्करोग होतो, ज्याला प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer) म्हणतात.

  प्रोस्टेट कर्करोग (Prostate Cancer) हा पुरुषांमधील कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे, ज्याची लक्षणे साधारणपणे ४० वर्षानंतर दिसून येतात. या कर्करोगाची नेमकी कारणे माहीत नसली तरी वृद्धत्वाची प्रक्रिया आणि आयुष्याच्या या टप्प्यात होणारे हार्मोनल बदल या दोन्हींमुळे हा धोका असल्याचे मानले जाते.

  प्रोस्टेटची वाढ रोखण्यासाठी योगासने उपयुक्त आहेत

  NCBI च्या अहवालानुसार, वैद्यकीयदृष्ट्या Prostate Cancer वर अनेक उपचार आहेत परंतु काही योगासन प्रोस्टेट कर्करोग रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते. योगासने पेल्विक फ्लोर स्नायूंना बळकट करून मदत करू शकतात. इतकंच नाही तर लक्षणांची तीव्रता कमी करण्यातही हे उपयुक्त आहे.

  विरासन (Virasana)

  हे करण्यासाठी, गुडघ्यावर बसा आणि बसताना, आपल्या पायाची बोटे पाठीकडे असावीत. तुम्ही उशीवरही बसू शकता. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि तुमचे हाताचे तळवे खाली, मांडीवर ठेवा. आपल्या गुडघ्यांवर भार येणार नाही याची काळजी घ्या; हा भार शक्य तितका पार्श्वभागावर येईल असं पाहा. थोडा वेळ असंच राह आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपले पाय बाजूला करून आरामात बसा.

  बद्ध कोनासन (Baddha Konasan)

   

   

  बसताना तुमचे पाय तुमच्या समोर असावेत. हिप सपोर्टसाठी तुम्ही उशीवर बसू शकता. तुमचे गुडघे बाजूला वाकवून तुमच्या पायाचे तळवे एकत्र करा. आपल्या दोन्ही पायांच्या टाचा शरीराजवळ आणण्याचा प्रयत्न तरा; ताण कमी करण्यासाठी, त्यांना आणखी वेगळे करा. तुम्ही तुमची बोटे एकमेकांना जोडा. काही वेळाने, तुमची हनुवटी पुढे करा, तुमचे हात पुढे करा आणि तुमच्या मणक्याला गोल करा. दीर्घ श्वास घेऊन आराम करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तणाव दूर करण्याचा प्रयत्न करा.  या स्थितीत राहून त्यांनंतर हे आसन सोडा.

  जानुशीर्षासन (Janusirsasana)

  दोन्ही पाय समोर वाढवून जमिनीवर बसा. डावा गुडघा वाकवा जेणेकरून या पायाचा तळ गुडघ्याजवळ ठेवा. आपले वजन डाव्या पायावर ठेवा आणि हळू हळू हात त्यांच्या समोर करा. आपला पाय पकडण्यासाठी पुढे जा, कंबरेत थोडं वाकून पायाकडे जाण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पायाच्या बोटांकडे पहा. तुमची हनुवटी पायावर टेकवा आणि तुमचे डोके पुढे आणि खाली वाकवून पायावर ठेवा. दोन्ही पाय सोडून हळू हळू सरळ स्थितीत परत या. डाव्या बाजूने पुन्हा हीच कृती करा.

  धनुरासन (Dhanurasana)

  आपल्या पोटावर झोपा हात जमिनीला समांतर ठेवा. आपले गुडघे वाकलेले ठेवून, आपल्या हाताने पाय पकडण्याचा प्रयत्न करा. पाय पकडल्यानंतर डोकं वर करा. डोके, छाती आणि खांदे वर उचला आणि वरच्या दिशेला पाहा. या स्थितीत दीर्घ श्वास घ्या. ३० सेकंद या स्थितीतच राहा आणि सोडा, हीच कृती आणखी दोन वेळा पुन्हा करा.

  Disclaimer : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.