चविष्ट राजस्थानी खस्ता पराठा

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सांस्कृतिक परंपरांपासून ते खाद्य संस्कृती पर्यंत सर्वच गोष्टी कौतुकास्पद आहे. आज आपण जाणून घेणार आहो एका राजस्थानी रेसिपी बद्दल. खस्ता पराठा हा एक राजस्थान मधिल पराठ्याचा लोकप्रिय प्रकार आहे. सुटसूटीत,कमी साहीत्यात व खमंग असा असल्याने बदल म्हणून खाण्यास काहीच हरकत नाही ! कसा करायचा ते पहा

साहीत्य :-
गव्हाचे पिठ दोन वाट्या
दही दोन चमचे
तेल एक टेस्पून
मिठ, ह्ळद, तिखट हींग धना-जिरा पावडर ओवा मिरी पूड भरड सर्व अर्धा चमचा

कृती :- प्रथम एका लहान वाटीमधे एक चमचा तेल घेऊन सर्व मसाला घालून हलवून ठेवावे. नंतर दुसर्या एका पसरट भांड्यामधे गव्हाचे पिठ घेऊन, मिठ, तेल व दही घालून पाणी घेऊन नेहमीप्रमाणे भिजवावी. दहा मिनीट झाकून ठेवावी. आता वरील मळलेल्या कणिकेचा एक लहान गोळा घेऊन पोळी लाटावी. पोळीवर तयार मसाला पसरावा व सूरळी करावी. सूरळी चक्राकार गुंडाळावी व परत गोळा करून हलक्या हाताने पराठा लाटावा. तेल सोडून खरपूस भाजावा. तयार पराठा नूसता अथवा कोणत्याही चटणी किंवा दह्या बरोबर सर्व्ह करा. हे पराठे टीकाऊ असल्याने प्रवासात नेण्यास उत्तम आहेत. तसेच मुलाना टीफीनमधे  देण्यास पण सोयीचे किवा घरीसूध्दा बदल म्हणून खाण्यास छानच लागतात !