रोज आवडीने भात खात आहात? मग ‘या’ गोष्टी नक्की जाणून घ्या, आरोग्यावर असा होतो परिणाम

गरजेपेक्षा जास्त तांदूळ खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचते. तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

    बहुतेक लोक भाकरी किंवा चपातीपेक्षा भात खाणे पसंत करतात. तांदूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण गरजेपेक्षा जास्त तांदूळ खाल्ल्याने आरोग्याला फायद्याऐवजी हानी पोहोचते. तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी भात खाणे हानिकारक ठरू शकते. तसेच तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. त्यामुळे तांदळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. चला तर मग जाणून घेऊया जास्त प्रमाणात तांदूळ खाल्ल्याने आरोग्याला होणारे नुकसान.

    भात खाण्याचे तोटे

    • मधुमेह ही समस्या होऊ शकते

    जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. कारण भातामध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना भात खाण्यास मनाई आहे.

    • वजन वाढू शकते

    जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने वजन वाढू शकते. कारण भातामध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढते. वाढत्या वजनामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर तांदळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करा.

    • किडनी समस्या असू शकतात

    अनेकांना कच्चा तांदूळ खायला आवडतो. पण कच्चा तांदूळ खाल्ल्याने स्टोनचा त्रास होऊ शकतो. याशिवाय शिजवलेला भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात स्टोन बनण्याची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे तांदळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.