
जर एखादी स्त्री दे ह व्यापाराच्या या दलदलीमध्ये घुसली आहे. आणि त्यामध्ये त्या स्त्रीचा दोष नाही, आणि जर त्यामध्ये समाजाची चूक आहे, तसे तर वे श्या स्त्रियांना समाजातून वगळण्यात आलेले आहे...
आपला देश हा अनेक परंपरा आणि मान्यतेचे भंडार आहे. अनेक परंपरा या पूर्वापार चालत आलेल्या आहे. त्यात काही गोष्टी या खटकणाऱ्यासुद्धा आहेत. यापैकी अशीच एक मान्यता म्हणजे दुर्गा मातेची मूर्ती स्थापना करण्यासाठी जी माती वापरली जाते ती वे श्यालयच्या परिसरातून घेतलेली असते आणि याला खूप शुभ देखील मानले जाते. पण आपल्यापैकी काही जणांच्या मनात हा प्रश्न येत असेल की, वेश्या स्त्रियांना समाजात अनै तिक मानले जाते. तसेच दे ह व्यापार करणार्यांकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले जाते. तर मग एवढ्या पवित्र स्थानामध्ये त्यांच्या घराच्या अंगणातील माती का वापरली जाते? जाणून घेऊया त्यामागे काय मान्यता आहे.
दुर्गा मातेची मूर्ती तयार करण्यासाठी वै श्यायलातील माती वापरली जाते यामागे दोन पौराणिक कथा आहेत. तसेच काही प्रचलित समजुती देखील आहेत.
पहिली पौराणिक कथा अशी आहे की, एक वेश्या होती. ती माता दुर्गेची खूप मोठी भक्त होती. अगदी मनापासून ती मातेची पूजा करायची.
परंतु वे श्या असल्या कारणाने तिला पूजेमध्ये योग्य तो सन्मान मिळत नव्हता. लोक तिचा कायम तिरस्कार करायचे. ती कायम असा विचार करायची की, मी तर स्वच्छेने या दे ह व्या पाराच्या दलदलीमध्ये पडले नाही मग माझ्या भक्तीला कोणीही समजून कसे काय घेत नाहीत? आता मी काय करू असा विचार करत करत एक दिवशी ती झोपून गेली.
आणि नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून माता दुर्गेची पूजा करू लागली. पण या वेळी असे काही घडले की ती आश्चर्यचकित झाली, कारण तिथे साक्षात दुर्गा माता प्रकट झालेली होती. दुर्गामाता तिला म्हणाली काल रात्री मी तुझ्या भक्तीला समजून घेतले. तू दुःखी होऊ नकोस. मी तुला असे वरदान देते की, येणाऱ्या काळामध्ये जेव्हा माझ्या पूजेसाठी काही आयोजन होईल.
जेव्हा माझी मूर्ती बनवली जाईल, त्यावेळी ती तेव्हाच जाईल जेव्हा मूर्तीमध्ये वे श्या लयच्या मातीचा उपयोग केला जाईल. अर्थात जर, वे श्यालययामधील माती न वापरता माझी मूर्ती बनवली गेली तर ती अपूर्ण मानली जाईल. तेव्हापासूनच दुर्गा मातेच्या मूर्तीमध्ये या मातीचा उपयोग केला जाऊ लागला.
दुसरी कथा अशी आहे की, एक खूप मोठे तपस्वी ऋषी होते. त्यांनी नवरात्रातील पूजेसाठी एका प्रसिद्ध कुंभाराकडून माता दुर्गेची मूर्ती बनवून घेतली होती. ती मूर्ती अतिशय सुंदर तयार झालेली होती. त्यावर त्या ऋषीला खूपच गर्व होऊ लागला. तो ऋषी त्या मूर्तीचे खूपच कौतुक करू लागला. पण त्याच रात्री माता दुर्गा त्या ऋषींच्या स्वप्नात आली. आणि म्हणाली, गर्वाने भरलेल्या मूर्तीची पूजा करण्यात काहीही अर्थ नाही. खरी श्रद्धा, खरी भक्ती ही मनामध्ये असते.
तिचा दिखावा करायचा नसतो. मग त्यावेळी ऋषीला आपली चूक कळली आणि देवीची स्वप्नातच माफी मागितली.
आता मी काय करावे असे देवीला तो विचारू लागला. तेव्हा दुर्गा मातेने त्याला सांगितले, गावामध्ये असणाऱ्या वे श्या लआतील माती घेऊन ये, आणि ही माती त्यामध्ये मिसळून माझी नवीन मूर्ती तयार करायला सांग. त्यावेळेस मी त्या प्रतिमेला पूजा करण्यायोग्य समजेल.
यास माजाने त्या लोकांना बदनाम करून ठेवले आहे. उलट त्यांना पापी मानले जाते. यामध्ये त्या स्त्रियांचा काहीही दो ष नाही. त्यामुळे असे लोकसुद्धा माझी भक्ती आणि माझ्या आशीर्वादला पात्र आहेत. असे सांगून दुर्गामाता लुप्त झाली. आणि सकाळी उठून त्या ऋषीने देवीचे सर्व बोलणे ऐकून तिने सांगितल्याप्रमाणे कुंभाराकडून मूर्ती बनवून घेतली. आणि मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
या दोन कथाबरोबरच असेही काही समज आहेत. जेव्हा एखादा पुरुष वे श्यालयच्या दारात जातो तेव्हा, तो त्याचे सर्व सद्गुन बाहेरच सोडतो. त्यामुळे वेश्यालयच्या बाहेरील जागा किंवा अंगण पवित्र होते. आणि म्हणूनच दुर्गा मातेची मूर्ती बनवण्यासाठी येथील मातीचा वापर केला जातो.
दुसरी समजूत अशी आहे की, जर एखादी स्त्री दे ह व्यापाराच्या या दलदलीमध्ये घुसली आहे. आणि त्यामध्ये त्या स्त्रीचा दोष नाही, आणि जर त्यामध्ये समाजाची चूक आहे, तर समा जाबरोबर त्या स्त्रीला जोडण्यासाठी एक प्रतीक म्हणून वे श्यालयतील मातीचा उपयोग देवीची मूर्ती बनवण्यासाठी केला जातो. ज्यामुळे त्या स्त्रियांचा मा नसिक त्रा स कमी होईल. तसे तर वे श्या स्त्रियांना समाजातून वगळण्यात आलेले आहे. पण या उत्सवाच्या सर्वात महत्त्वाच्या कामामध्ये त्यांना सामील करण्याचा एक खूप चांगला मार्ग आहे.