Are you in love

तसे काही खास कारण नसताना तुमच्या आनंदाला पारावार राहत नाही. तुमचे नाजूक, लाजून हसणेही थांबत नाही. याचा अर्थ असा की, तुम्ही हमखास प्रेमात पडला आहात. कुणी त्या व्यक्तीचे नाव काढले, तरी तुमच्या चेह-यावरचा नूर बदलतो. मनात तरंग उमटू लागतात. ती/तो समोर असो वा नसो, त्यासोबत घालवलेल्या आठवणी तुमच्या चेह-यावर नकळतपणे हसू आणतात(Feeling of love).

    नटण्या-मुरडण्याची हौस

    मेकअप करण्यात किंवा ड्रेसिंग करण्यात फार वेळ घालवून सुंदर दिसण्यास काहीच हरकत नाही. नटण्या-मुरडण्याची हौस असलेले यासाठी निश्चित असा वेळ राखून ठेवतात. मात्र, या सगळ्यांसाठी तुम्ही जेव्हा फारच काळजी घेता, प्रत्येक गोष्टीत कटाक्ष ठेवता, त्याला/तिला हे आवडेल की नाही, याचा विचार करून शॉपिंग करता, तेव्हा नक्कीच तुम्ही प्रेमात पडला आहात. विशेषत: त्या व्यक्तीला भेटायला जाता तेव्हा काही राहिले तर नाही, हे पाहण्यासाठी सारखा आरसा पाहत असाल, तर तुमच्या मनात त्याविषयी नक्की हळवा कोपरा तयार झाला आहे.

    त्याची/तिची आवड जपणे

    त्याच्या/तिच्या प्रत्येक आवडत्या गोष्टीची दखल घेऊ लागता, तेव्हा तुम्ही त्याच्या/तिच्याकडे आकर्षित होतो हे जाणा. त्याला/तिला आवडणारी प्रत्येक बाब करण्यासाठी तुम्ही तयार असता, म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीत रस वाढू लागला आहे. म्हणजे, तिला स्वयंपाकात अजिबात आवड नसल्यास तो केवळ फुडी आहे म्हणून त्याच्यासाठी किचनमध्ये जाऊन काहीतरी पदार्थ ती बनवणारच. तिला छोटय़ा गोष्टींत आनंद शोधायला आवडतो म्हटल्यानंतर तोही असा आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो!

    इशारो इशारो में…

    साईन्स, सिग्नल्सवर तुमचा विश्वास असो वा नसो, पण प्रेमात असताना तिच्या/त्याच्याकडून प्रेम, ओढ दर्शवणारा काही सिग्नल मिळतो का, या प्रतीक्षेत तुम्ही असता. इशारो इशारो में.. म्हणतात ते हेच. हा भाव डोळ्यांतून व्यक्त होणारा असतो किंवा देहबोलीतून. त्याने/तिने पाठवलेले मेसेज, व्हॉट्सअॅनप पिंग तुम्ही वारंवार वाचत असाल, तर कुठेतरी पाणी मुरत आहे हे नक्की. हा वेडेपणा आहे, पण प्रेमात पडल्यानंतर ही गोष्ट खूप आनंद देते.