hug day

फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक(valentine week) साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये आज (१२ फेब्रुवारी) हग डे(hug day) आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला जादू की झप्पी(jadu ki jhappi) दिल्याने खूप गोष्टींमध्ये फरक पडू शकतो.

    फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक(valentine week) साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन वीकमध्ये आज (१२ फेब्रुवारी) हग डे(hug day) आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीला जादू की झप्पी(jadu ki jhappi) दिल्याने खूप गोष्टींमध्ये फरक पडू शकतो. फक्त आपल्या जोडीदारालाच नाही तर तुम्ही आपले भाऊ- बहीण, आपले आईवडील, मित्रमैत्रिणी यांना प्रेमाने मिठी मारा. त्यांना वेगळाच आनंद होईल. प्रेमाने मिठी मारण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूयात.

    • अनेक संशोधनामध्ये असे सांगण्यात आले आहे की, एखाद्या खास व्यक्तिला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण कमी होतं. मिठी मारल्याने ताणतणाव कमी होतात. तसेच स्मरणशक्ती चांगली राहते.
    • साधारण ४०० हून अधिक लोकांचा अभ्यास करून संशोधकांकडून निष्कर्ष काढण्यात आला आहे की, मिठी मारल्याने माणसाच्या आजारी पडण्याची शक्यता कमी होते. ज्या लोकांना पार्टनरची साथ मिळते ते कमी आजारी पडतात.
    • जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तिला मिठी मारता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोन जास्त प्रमाणात तयार होते. या हार्मोनमुळे मूड फ्रेश होतो.