ही ऐतिहासिक पेंटिंग अश्लील नसून पवित्र आहे; कारण समजल्यावर तुमचाही बदलेल दृष्टिकोन!

युरोपियन देशातील ही गोष्ट आहे. तिथे एका व्यक्तीला (जो पेंटिंगमध्ये दिसतोय) अन्न आणि पाण्यावाचून मारण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

    ही प्राचीन पैंटिंग अनेक ठिकाणी तुम्ही बघितली असेल परंतु मराठीत याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने अनेकांचा याकडे पाहण्याचा दृदष्टिकोन हा अश्लील असल्याचे समोर आले. परंतु वास्तव मात्र फारच विरुद्ध आहे. ते आपण पुढे समजून घेऊच  ,पण त्याआधी हा प्रसंग नेमका काय आहे ते जाणून घेऊया.

     

    युरोपियन देशातील ही गोष्ट आहे. तिथे एका व्यक्तीला (जो पेंटिंगमध्ये दिसतोय) अन्न आणि पाण्यावाचून मारण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या कैद्याच्या मुलीने जेल प्रशासनाकडे एक विनंती केली. वडील जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत त्यांना रोज भेटू द्यावे अशी ती मागणी होती. म्हातारा अन्न पाण्यावाचून जास्त दिवस जगणार नाही हे प्रशासनाला माहिती होते, म्हणून लेकीला तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. कैद्याची मुलगी तिच्या वडिलांना भेटायला रोज न चुकता येत असे. जेलमधले पोलीस त्या महिलेची कसून तपासणी कराचे, जेणेकरून कुठलीही खाद्य सामुग्री तिला आतमध्ये नेता येणार नाही.

    कैद्याची मुलगी नुकतीच बाळंतीन झाली होती. ती तिच्या तान्ह्या बाळाला घेऊन तिच्या वडिलांच्या भेटीला तुरुंगात जायची. हा क्रम सहा महिने चालला. अन्न पाण्यावाचून कैदी इतके दिवस कसे काय जगतोय असा प्रश्न पोलिसांना पडला. त्यानंतर त्यांनी कैदी आणि त्याच्या मुलीच्या भेटीवर छुपी नजर ठेवली. समोर जे आले ते अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारे होते. तुरुंगात येणारी मुलगी आपल्या वडिलांना स्तनपान करवायची. एका मुलीने आपल्या वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी आईची भूमिका निभावली. हे दृश्य पाहून तुरुंगातील जेलर हलवा झाला आणि त्या वृद्धाला जेलमधून सोडून दिले.

    स्त्रीचे मन किती उदार असू शकते याचे जिवंत उदाहरण म्हणजे कैदी सिमॉन (cimon) आणि मुलगी (Pero) यांची ही पेंटिंग आहे. १६३० ते १६४० च्या दशकात ही पेंटिंग पेटर पॉल रुबेन्स  Peter Paul Rubens  यांनी काढली आहे.