जोडीदार असूनही स्वप्नात येते का ड्रीम गर्ल? मग ‘हे’ नक्की वाचा!

प्नामध्ये घालवलेला एखादा चांगला काळ आपल्याला खऱ्या आयुष्यात हवा असतो. जोडीदाराने आपल्यासोबत असे राहावे असे वाटत असते.

स्वप्न पाहायला कोणाला आवडत नाही. त्यात जर स्वप्नामध्ये आवडत असलेला रोमान्स पाहायला मिळाला तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. स्त्री किंवा पुरुषा दोघांच्याही स्वप्नामध्ये त्यांच्या असलेल्या सेक्स फँटसी स्वप्नात येत असतात. या फँटसी रंगवणे वाईट नाही. पण अशी स्वप्न आपल्याला सातत्याने पडत नाहीत. काही ठराविक वेळीच आपल्याला अशी स्वप्न येतात. तुमच्या स्वप्नांमध्ये जोडीदाराशिवाय जर ‘ड्रिम गर्ल’ दिसत असेल तर त्यामागे काही कारणे आहेत. जाणून घेऊया तुमच्यासोबत असे का होत आहे.

बरेचदा आपल्या स्वप्नांना काहीच अर्थ नसतो असे आपल्याला वाटते. दिवसभरात एखादा विषय चघळताना त्या विषयाशी निगडीत अनेक व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसत राहतात. त्याचा घटनाक्रम किंवा घटना ही वेगळी असली तरी या व्यक्ती परिचयाच्या असतात. पण कधीकधी स्वप्नात अशी व्यक्ती येते जी आपण कधीच पाहिलेली नसते. पण तिच्यासोबत स्वप्नात घालवलेला तो वेळ आपण झोपेतून उठल्यावरही विसरु शकत नाही. सतत त्या आनंदाची आठवण आपल्याला होत राहते आणि त्यातच आपण राहावे असे वाटते.

असे स्वप्न तुम्हाला का पडते ? –  स्वप्नामध्ये घालवलेला एखादा चांगला काळ आपल्याला खऱ्या आयुष्यात हवा असतो. जोडीदाराने आपल्यासोबत असे राहावे असे वाटत असते. ही इच्छा जोडीदाराकडून पूर्ण झाली नाही की मात्र हा आनंद देणारी एक व्यक्ती आपण आपल्याच मनात तयार करत असतो. कधी तरी ही व्यक्ती खऱ्या आयुष्याशी निगडीत असते किंवा काल्पनिक असते.

इलाज-   जर तुम्हाला अशा स्वप्नांमधून बाहेर पडायचे असेल आणि खऱ्या आयुष्यात तो आनंद आणायचा असेल तर संवाद हा त्यावरील उत्तम इलाज आहे. तुम्ही जोडीदारासोबत वेळ घालवण्याची त्याला आपल्यात सामावून घेण्याची गरज आहे.