या विशेष कारणामुळे स्त्रिया ठेवतात परपुरुषाशी संबंध; अनेकांना नाही माहिती

स्त्रिया परपुरुषासोबत संबंध प्रस्थापित करतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पतीचे पत्नीवरील कमी प्रेम. आजकाल बरेच पुरुष आपल्या पत्नीवर प्रेम करण्यात कमी पडत आहेत. काही पुरुष लग्नाच्या चार-सहा वर्षांमध्येच इतके बदलून जात आहेत की, आपल्या पत्नीची साधी विचारपूसही करत नाही.

    आजकाल बऱ्याच स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवत आहेत. बाहेर एखादा चांगला पुरुष मित्र असणे ही आजकालच्या स्त्रियांची जणू फॅशनच झाली आहे. असे करण्यात स्त्रियांना काही गैर वाटत नाही. बऱ्याच स्त्रियांच्या अश्या वागण्यामुळे त्यांचे घटस्फोटही होत आहेत.

    लग्नाचा नवरा असताना परपुरुषाशी संबंध ठेवणे चुकीचेच. मग आता प्रश्न पडतो की अशी कोणती कारणे आहेत जी स्त्रियांना परपुरुषाशी संबंध ठेवण्यासाठी कारणीभूत आहेत? चला तर मग पाहुयात.

    स्त्रिया परपुरुषासोबत संबंध प्रस्थापित करतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पतीचे पत्नीवरील कमी प्रेम. आजकाल बरेच पुरुष आपल्या पत्नीवर प्रेम करण्यात कमी पडत आहेत. काही पुरुष लग्नाच्या चार-सहा वर्षांमध्येच इतके बदलून जात आहेत की, आपल्या पत्नीची साधी विचारपूसही करत नाही. स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात याचे आणखीन एक कारण असे की, पती पत्नीचा कमी सहवास. पतीचे आपल्या पत्नीकडे होणारे सततचे दुर्लक्ष.

    ज्यावेळी पती पत्नीकडे दुर्लक्ष करायला लागतो, त्यावेळी पत्नी दुःखी होते. अश्यावेळी तिला समजून घेणाऱ्या पुरुषाची गरज असते, आणि असा एखादा पुरुष जर तीला भेटला किंवा, एखादा पुरुष आधीच तिच्या मागावर असेल तर मग त्या दोघांमध्ये संबंध प्रस्थापित होणे हे साहजिकच आहे. काही              पती-पत्नीच्या नात्यामध्ये असेही होते की, पती आपल्या पत्नीच्या शारीरिक गरजा भागविण्यात कमी पडतो आणि या कारणामुळे पत्नी एक नवीन साथीदार शोधते, जो तिला शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या पूर्णपणे संतुष्ट करू शकेल.

     

    स्त्रियांनी अश्याप्रकारे आपल्या पतीला धोका देणे चुकीचे आहे . शारीरिक, भावनिक दृष्ट्या जर तुम्ही त्याच्याकडून सुखी नसाल तर त्याच्याशी बोलले पाहिजे. स्त्रियांनी कायम आपल्या पतीसोबत एकनिष्ठ राहिलं पाहिजे.

    पैसे, वस्तू, गिफ्ट्स मिळवण्यासाठी बऱ्याच स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतात. बरेच पुरुष स्त्रियांना पैशांचे, गिफ्ट्सचे आणि विविध प्रकारच्या वस्तूंचे आमिष दाखवून तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करतात. ज्या स्त्रियांना पैशांची गरज असते, जी गरज पती पूर्ण करू शकत नाही, ज्या स्त्रियांना वेगवेगळ्या वस्तूंची गरज असते जी गरज पती पूर्ण करू शकत अश्या स्त्रिया त्यांच्या या भौतिक गरजा परपुरुषाकडून पूर्ण करून घेतात आणि त्या मोबदल्यात परपुरुषाशी संबंधामध्ये राहतात.

    प्रोमोशन, पगारवाढ मिळवण्यासाठी. मोठ्या शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया प्रोमोशन आणि पगारवाढ मिळवण्यासाठी आपल्या वरीष्टांसोबत, बॉससोबत संबंध प्रस्थापित करतात. थोड्याश्या पैश्यांसाठी आणि मानसन्मानासाठी स्त्रिया स्वतःच्या चारित्र्याला पणाला लावत आहेत हे फार चुकीचे आहे. पतीच्या डोळ्यामाघारी स्त्रियांनी असे करणे योग्य नाही. वरीष्टांसोबत संबंध ठेवून प्रोमोशन, पगारवाढ मिळेलही परंतु चारित्र्याला पडलेल्या डागाचे काय? गेलेल्या इज्जतीचे काय? ती परत मिळणार का?

    दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे पाहून, आपल्यालाही एखादा पुरुष मित्र असावा ही भावना. बऱ्याच स्त्रिया या सोबतच्या स्त्रीचे पाहून वागत असतात. तिने ही गोष्ट केली तर मी करणारच अशी स्त्रियांची भावना असते. स्त्रियांच्या अश्या स्वभावाचा परिणाम असा की, काही स्त्रिया या त्या स्त्रीने परपुरुषासोबत संबंध ठेवले म्हणून मी पण ठेवणार अश्या स्वभावाच्या असतात. तिला पुरुष मित्र आहे तर मलाही असावा अशी बऱ्याच स्त्रियांची भावना असते, जे की साफ चुकीचे आहे.

    पतीच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून. बऱ्याच स्त्रिया या पतीच्या सततच्या होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून नवीन साथीदार शोधतात. बरेच पुरुष आपल्या पत्नीवर सतत जाच करत असतात. सतत तिला छळत असतात. अश्यावेळी तिला आधार देणारा, तिची विचारपूस करणारा एखादा पुरुष तिला भेटला तर ती स्त्री त्या पुरुषामध्ये गुंतून जाते. स्त्रिया या अतिसंवेदनशील असतात, पतीने त्यांना रागावले, मारले आणि एखादा पुरुष त्यांची चौकशी करत असेल तर स्त्रिया या त्या पुरुषाला आपलं सर्वस्व अर्पण करतात. थोड्याश्या मानसिक त्रासामुळे, नवऱ्यासोबत होणाऱ्या भांडणामुळे स्त्रियांनी भावनेच्या ओघामध्ये लगेच परपुरुषाशी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय कधीच घेऊ नये.

    पतीच्या गुणांमुळे, जर पतीचे एखाद्या परस्त्रीसोबत संबंध असतील तर अश्या पुरुषांच्या बायकाही पतीच्या पायावर पाय ठेवत नवीन संबंध प्रस्थापित करतात. बरेच पुरुष लग्नाची पत्नी घरामध्ये असताना परस्त्रीसोबत संबंध प्रस्थापित करतात, त्याचा परिणाम असा होतो की त्या पुरुषांच्या बायकाही परपुरुषाशी संबंध ठेवतात.

    पतीच्या अश्या वागण्यामुळे त्यांना जणू मोकळीकच मिळालेली असते. पतीचे परस्त्रीसोबत संबंध आणि पत्नीचे परपुरुषासोबत संबंध याचा परिमाण त्या पती-पत्नीवर जास्त होत नाही, कारण ते दोघेही चारित्र्य गमावलेली माणसं. या सर्व गोष्टीचा परिणाम होतो तो घरातील लेकरांवर, कारण आईवडिलांच्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण हे लेकरं करतच असतात. आईवडिलांच्या अश्या गोष्टींचे अनुकरण करून एक चांगली घडणारी नवीन पिढी बिघडत चाललेली आहे.