मैत्री आणि प्रेमातले कन्फ्युजन वेळेतच करा दूर; अन्यथा…

दोन जणांमध्ये मैत्री असणे सामान्य गोष्ट आहे. ब-याच वेळा मैत्रीत प्रेम निर्माण होत. पण जर प्रेम एकतर्फी असेल आणि गैरसमज झाला तर समस्या गंभीर होऊ शकते. कोणत्याही मुलाला तुम्ही त्याचा प्रेमात आहात या कन्फ्यूजन मध्ये ठेवण चुकीचे आहे. कधी-कधी स्वतः मुलीला याविषयी जाणिव नसते. आपण स्वतःहून समोरच्याला तो आपल्याला आवडतो की नाही हे स्पष्ट ठेवणं आवश्यक आहे.

आपल्या भावना स्पष्ट पणे समोर ठेवा. हे दोघांमधील नात्यासाठी उत्तम राहील. मुलींप्रमाणे काही मुलेसुद्धा भावूक असतात. मुलीची मैत्री, त्यांनी घेतलेली काळजी समोरच्याला मुलांच्या जवळ घेऊन जाते. जर मुलगी त्याला पसंद करत असेल, तर काही प्रश्नचं नाही. पण असं नसेल तर ते स्पष्ट करणं जास्त चांगलं. आपसातील मैत्रीवर ताबा ठेवा. तुम्ही समोरच्याला फक्त मित्र मानत असाल, तर फक्त मैत्री पर्यंतचं मर्यादित रहा.