
आज व्हॅलेटाईन वीकमधल्या(valentine week) दुसऱ्या दिवशी प्रपोज डे (propose day)आहे. या दिवशी कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रपोज करु शकता , हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कालपासून म्हणजे ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक(valentine week) सुरु झाला आहे. आठवड्याभरात प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता डे आहे. आज व्हॅलेटाईन वीकमधल्या(valentine week) दुसऱ्या दिवशी प्रपोज डे (propose day)आहे. या दिवशी कोणत्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रपोज करु शकता , हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पत्र किंवा चिठ्ठी लिहा(write a letter)
तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसमोर तुम्ही आपलं प्रेम थेट व्यक्त करू शकत नसाल तर पत्र किंवा चिठ्ठी लिहून तुम्ही प्रेमाच्या भावना व्यक्त करु शकता.
गाणं गा(singing)
थेट बोलण्याचा किंवा चिठ्ठी लिहण्याचा पर्यायही तुम्हाला जमत नाहीये असं वाटत असेल तर एखादं रोमॅन्टीक गाण गाऊन तुम्ही प्रेम व्यक्त करू शकता.
जेवणाचा बेत(cooking)
असं म्हणतात की ह्रदयाचा मार्ग पोटातून जातो. त्यामुळे जेवणाचा मस्त बेत आखा. तुमच्या आवडत्या व्यक्तीची आवडती डिश कोणती हे जाणून घ्या आणि त्यानुसार अन्नपदार्थ तयार करा. संधी साधून तुमच्या ह्रदयात काय आहे हे सांगूून टाका.
गिफ्ट द्या(gifts)
गिफ्टचा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. एखादं चांगलं गिफ्ट आवडत्या व्यक्तीला देऊन तुम्ही प्रपोज करु शकता. चॉकलेट्स, फुल इत्यादी गोष्टी तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला तुम्ही सरप्राईज देऊ शकता.